भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अनेक अडचणींवर मात करत आता सरावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. शमीच्या सरावाचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पत्नी हसीन जहाँ हा शमीला त्रास देऊन त्याच्यापुढील अडचणी वाढवत असल्याचे पाहायला मिळत होते. हसीनने तर एक आपला न्यूड फोटो पोस्ट केला होता आणि त्याबरोबर शमी असल्याचे तिने सांगितले होते. त्याचबरोबर काहा व्हिडीओ पोस्ट करून ती शमीला त्रास देत होती. याबरोबर शमीला बऱ्याच अडचणींवर मात करावी लागली आहे.

वाचा-

सध्याच्या घडीला करोना व्हायरसचे संकट आहे. त्यामुळे भारतीय संघ सराव करताना दिसत नाही. पण जर गोलंदाजाने आपला फिटनेस राखला नाही तर त्याला यापुढे खेळणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे शमीने सरावाला सुरुवात केल्याचे समजते आहे. यापुढेही शमीला काही अचडणींवर मात करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

वाचा-

करोना व्हारसनंतर क्रिकेट सुरु करताना आयसीसीने काही नवीन नियम बनवले आहेत. हे नियम गोलंदाजांसाठी कठीण असल्याचे म्हटले जात आहे. कारण गोलंदाज चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी किंवा घाम चेंडूला लावायचे. त्यामुळे चेंडूला चकाकी यायची, त्याचबरोबर चेंडू रिव्हर्स स्विंग करायलाही त्याची मदत व्हायची. पण करोनानंतर जर या गोष्टींचा वापर करायला मिळाला नाही तर गोलंदाजांपुढे बऱ्याच गोष्टी अवघड होऊन बसतील, असे म्हटले जात आहे.

वाचा-

याबाबत शमी म्हणाला की, ” प्रत्येक खेळाडूला काही ना काही सवयी असतात. प्रत्येक गोलंदाजाला चेंडूला थुंकी किंवा घाम लावून चकाकी देण्याची सवय आहे. पण आता नविन नियमांनुसार या गोष्टी आता करता येणार नाही. त्यामुळे ही सवय मोडणे अवघड आहे. पण काही बदल आता क्रिकेटमध्ये करावे लागणार आहेत.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here