नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने आजच्या दिवशीच म्हणजे १३ जुलै १९७४ रोजी सामना ( 1st ODI match) खेळला होता. लीड्स मैदानावर भारताचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध झाला होता. भारतीय संघाने आजच्या घडीला ९८७ वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी ५१३ सामन्यात विजय, ४२४ मध्ये पराभव, ९ सामने टाय तर ४१ सामन्यांचा निकाल लागला नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला वनडे सामना १९७१ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आला होता. त्यानंतर ३ वर्षांनी भारतीय संघ प्रथम वनडे क्रिकेटमध्ये उतरला. १३ जुलै १९७४ रोजी लीड्सवर झालेला हा सामना ५५ ओव्हरचा होता. इंग्लंडचे कर्णधार माइक डेनीज यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक वनडेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते अजित वाडेकर यांनी.

वाचा-
प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ५३.५ षटकात २६५ धावा केल्या होत्या. भारताकडून ब्रिजेश पटेल यांनी ८२ धावा केल्या. तर कर्णधार वाडेकर यांनी ६७ धावांची खेळी केली. भारतीय डावात विकेटकीपर फारूख इंजिनिअर यांनी ३२, सुनिल गावसकर यांनी २८ धावांचे योगदान दिले.

विजायसाठीचे २६६ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ५१.१ षटकात ६ विकेटच्या मोबदल्यात पार केले. भारताला या पहिल्या सामन्यात ४ विकेटने पराभव स्विकारावा लागला. इंग्लंडकडून जॉनि एडरिच यांनी ९७ चेंडूत ९० धावा केल्या. यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तर टोनी ग्रेग यांनी ४० आणि किथ फ्लेचर यांनी ३९ धावा केल्या. भारताकडून ,
( हे देखील वाचा- ) बिशन सिंह बेदी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर मदन लाल आणि श्रीनिवासन वेंकटराघवन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्यानंतर भारताने १९७५ साली इस्ट आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात वनडेतील पहिला विजय मिळवला. हेडिग्ले येथे झालेल्या सामन्यात भारताने इस्ट आफ्रिकेचा १० विकेटनी पराभव केला होता.

असा होता भारतीय संघ- सुनील गावसकर, सुधीर नाईक, अजित वाडेकर(कर्णधार), गुंडप्पा विश्वनाथ, फारूख इंजिनिअर, ब्रिजेश पटेल, एकनाथ सोलकर, सैयद आबिद अली, मदन लाल, श्रीनिवास वेंकटराघवन, बिशन सिंह बेदी

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here