वाचा-
१८ वर्षापूर्वी १३ जुलै २००२ रोजी भारतीय संघाने गांगुलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर विजय मिळवला होता. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात नेटवेस्ट मालिकेतील फायनल सामना झाला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने भारतीय संघाला ३२६ धावांचे आव्हान दिले होते.
या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली होती. टीम इंडियाच्या चाहत्यांनी सामना पाहण्याचे सोडून दिले होते. पण आणि यांनी इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास काढून घेतला. कैफने या सामन्यात ८७ धावांची खेळी केली आणि पराभव विजयात बदलला.
वाचा-
भारतीय संघ फलंदाजीसाठी आल्यावर गांगुली, सेहवाग, सचिन, द्रविड हे दिग्गज फलंदाज फक्त १४६ धावांवर बाद झाले. तेव्हा कैफ आणि युवराज मैदानात उतरले. या सामन्यात युवीने ६९ धावा केल्या आणि भारताने दोन विकेटनी विजय मिळवला. कैफला या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला.
‘दादा’ने दिले उत्तर
फायनल मॅच जिंकल्यानंतर गांगुलीने मैदानावरील गॅलरीत टी-शर्ट काढून हवेत फिरवला होता. त्याच वर्षी मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर फ्लिंटॉफने टी-शर्ट हवेत फिरवला होता. तेव्हा इंग्लंडने मालिका ३-३ अशी बरोबरी साधली होती. फ्लिटॉफ टी-शर्ट काढून मैदानात फिरला होता. गांगुलीने लॉड्सवरील विजयानंतर त्याला उत्तर दिले होते.
वाचा-
कैफच्या करिअरमधील हा सर्वोच्च क्षण होता. २०१८ साली जेव्हा त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा १३ जुलै हीच तारीख निवडली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times