नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने परदेशात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयांमध्ये २००२ सालच्या नेटवेस्ट मालिकेचा समावेश होतो. ३२६ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली होती. तेव्हा मैदानात उतरले आणि ही जोडी. या विजयात कैफने त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम अशी खेळी केली होती. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात या विजयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. संघातील सिनिअर खेळाडू अपयशी ठरल्यानंतर ज्युनिअर्सनी शानदार विजय मिळवून दिला होता. या सामन्यात गांगुलीने टी-शर्ट काढून हवेत फिरवला आणि इंग्लंडच्या फ्लिंटॉफला उत्तर दिले होते.

वाचा-
१८ वर्षापूर्वी १३ जुलै २००२ रोजी भारतीय संघाने गांगुलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर विजय मिळवला होता. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात नेटवेस्ट मालिकेतील फायनल सामना झाला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने भारतीय संघाला ३२६ धावांचे आव्हान दिले होते. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली होती. टीम इंडियाच्या चाहत्यांनी सामना पाहण्याचे सोडून दिले होते. पण युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास काढून घेतला. कैफने या सामन्यात ८७ धावांची खेळी केली आणि पराभव विजयात बदलला.

वाचा-
या सामन्यात कैफ आणि युवराज यांनी १२१ धावांची भागिदारी केली. युवराज बाद झाल्यानंतर हरभजन सिंगने कैफची चांगली साथ दिली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या.

१८ वर्षापूर्वी मिळवलेल्या या विजयाबद्दल कैफ म्हणाला, त्या सामन्यानंतर भारतीय क्रिकेटला कायम स्वरुपी बदलून टाकले. त्या विजयामुळे आम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करू शकते हे दाखवून दिले. १९८३ मध्ये वर्ल्ड कप फायनलच्या विजयानंतरचा हा सर्वात मोठा विजय ठरला.

वाचा-
इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलताना कैफ म्हणाला, या विजयानंतर मी भारतात आलो तेव्हा अलहाबादमध्ये मला खुल्या जीपमधून नेण्यात आले. माझ्या घरी जाण्यासाठीचे अंतर पाच ते सहा किलोमीटर असून ते पार करण्यासाठी ४ तास लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांनी गर्दी केली. मी जेव्हा लहान होतो तेव्हा यांनी निवडणूक जिंकल्यानंतर युपीत जीपमधून फिरलेले पाहिले होते. त्या दिवशी वाटले की मी अमिताभ बच्चन आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here