दुखापत ही खेळाडूंच्या पाचवीलाच पुजलेली असते. पण या दुखापतीतून खेळाडू कसा सावरतो, हे सर्वात महत्वाचे असते. एका खेळाडूवर दुखापतीनंतर सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला नैराश्येने ग्रासल्याचे पाहायला मिळाले. वर्षभर त्याला क्रिकेटपासून लांब रहावे लागले होते. पण हाच खेळाडू वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. कारण तब्बल २० वर्षांनंतर त्यांना इंग्लंडमध्ये पहिला कसोटी विजय मिळवता आला आहे.

करोनानंतर चार महिन्यांनंतर प्रथमच खेळवण्यात आलेल्या सामन्यात अखेर बाजी मारली ती वेस्ट इंडिजने. इंग्लंडने सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाछलाग करत वेस्ट इंडिज इंग्लंडवर थरारक चार विकेट्स राखत विजय मिळवला. जेरमिन ब्लॅकवूड, कर्णधार जेसन होल्डन आणि वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रिएल हे वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरले.

या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस धरण्याचे काम गॅब्रिएल आणि होल्डर या दोघांनी केले. या दोघांच्या गोलंदाजीमुळेच वेस्ट इंडिजला २० वर्षांनंतर इंग्लंडमध्ये विजय मिळवता आल्याचे पाहायला मिळाले. या लढतीत तब्बल ९ फलंदाजांना बाद करणाऱ्या गॅब्रिएलला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पण या चांगल्या कामगिरीसाठी त्याला तब्बल वर्षभर वाट बघावी लागली आहे.

गॅब्रिएलला एक मोठी दुखापत झाली होती. त्यासाठी त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर गॅब्रिएल हा नैराश्येच्या गर्तेत अडकल्याचे पाहायला मिळाले होते. कारण वर्षभर त्याला क्रिकेटच्या मैदानात उतरता आले नव्हते. पण हाच गॅब्रिएल वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरल्याचे पाहायला मिळाले.

वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला आर्चर हा आग ओकत होता. कारण वेस्ट इंडिजला तीन धक्के यावेळी आर्चरने दिले. पण वेस्ट इंडिजच्या जेरमिन ब्लॅकवूड हा या विजयाचा नायक ठरला. कारण आर्चर भेदक गोलंदाजी करत असताना ब्लॅकवूड हा खेळपट्टीवर ठाण मांडून राहीला आणि संघाकडून सर्वाधिक धावा करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. यावेळी ब्लॅकवूडचा चांगली साथ दिली ती रोस्टन चेसने (३७), कारण या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी वेस्ट इंडिजच्या विजयासाठी निर्णायक ठरली. ब्लॅकवूडने यावेळी १२ चौकारांच्या मदतीने ९५ धावांची दमदार खेळी साकारत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण त्याला शतकही झळकावता आले नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here