एक कर्णधार म्हणून गांगुलीने भारताचा संघ घडवला होता. आपल्यातील आक्रमक बाणा त्याने संघातही रुजवला होता. त्यामुळेच गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रतिस्पर्धी घाबरत होते. गांगुलीने भारतीय संघाचा क्रिकेट विश्वात एक दरारा निर्माण केला होता. त्यामुळे गांगुीचे बरेच किस्से क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध आहेत. पण संगकाराने मात्र गांगुलीचा एक खास किस्सा आता शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
नेमके घडले तरी काय होते…
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एक सामना झाला होता. या सामन्यात गांगुली आणि श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू रसेल अरनॉल्ड यांच्यामध्ये मैदानात वाद झाला होता. पंचांनीही यावेळी गांगुलीला चांगलीच ताकिद दिली होती. त्यानंतर गांगुली थेट श्रीलंकेच्या ड्रेसिंगरुममध्ये घुसल्याचे पाहायला मिळाले होते.
ही गोष्ट २००२ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधली होती. या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करत होता आणि गांगुली चांगलाच आक्रमक झाल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यावेळी मैदानात गांगुली आणइ रसेल यांचा वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला होता की, पंचांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर मैदानात हे प्रकरण शांत झाले होते. पण मैदानाबाहेर मात्र हे प्रकरण गांगुलीच्या चांगलेच लक्षात होते.
याप्रकरणाबद्दल संगकारा म्हणाला की, ” माझ्या ही गोष्ट चांगलीच लक्षात आहे. कारण त्यावेळी गांगुली आणि रसेल यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. त्यावेळी गांगुलीला पंचांनी अखेरची ताकिदही दिली होती. त्यानंतर कदाचित गांगुलीवर बंदी येऊ शकली असती. त्यावेळी गांगुली श्रीलंकेच्या ड्रेसिंगरुममध्ये आला होता. त्यांनी आम्हाला सांगितले की, जर हे प्रकरण वाढत गेले तर ते चांगले होणार नाही. कदाचित माझ्यावरही कारवाई होऊ शकते. त्यावेळी आम्ही गांगुलीला शांत केले होते. त्याचबरोबर हे प्रकरण पुढे कसे वाढणार नाही, यायी शाश्वतीही दिली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times