नवी दिल्ली: फाइल करत नसाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने रविवारी एक नवी सुविधा सुरू केली असून यामुळे जे लोक इनकम टॅक्स रिटर्न भरत नाही त्यांना टॅक्स द्यावा लागणार आहे. या संदर्भात आयकर विभागाने रविवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी याची माहिती दिली आहे.

जर तुम्ही रिटर्न फाइल करत नसाल आणि बँकेतून २० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढत असाल तर त्यावर टीटीएस द्यावा लागले. आयकर विभागाने यासाठी सर्व बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकांतून आणि पोस्ट ऑफिसमधून २० लाखहून अधिक रुपये काढल्यास त्यावर किती दराने टीडीएस वसूल करायचा यासाठी नवी व्यवस्था केली आहे.

वाचा-
या नव्या व्यवस्थेनुसार बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून पैसे काढणाऱ्या व्यक्तीला फक्त पॅन कार्ड नंबर द्यावा लागले. जर इनकम टॅक्स रिटर्न दाखल केलेली व्यक्ती असेल तर त्याला एक कोटींपेक्षा अधिक रक्कमेवर २ टक्के टीडीएस द्यावा लागले आणि इनकम टॅक्स रिटर्न दाखल न करणारी व्यक्ती असेल तर त्याला २० लाखापेक्षा अधिक रक्कमेवर दोन टक्के दराने टीडीएस द्यावा लागले. जर व्यक्तीने एक कोटी पेक्षा अधिक रक्कम काढली तर त्याला ५ टक्के टीडीएस द्यावा लागले.

या व्यवस्थेद्वारे आतापर्यंत ५३ हजार व्हेरिफिकेशन रिक्वेस्टची सत्यता तपासण्यात आली आहे. ही सुविधा इनकम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर एक जुलै २०२० पासून उपलब्ध आहे. वेबसाइटवर Quick Links या विभागात Verification of applicability u/s 194N वर तुम्ही ही सुविधा पाहू शकता.

वाचा-
जर तुम्ही गेल्या ३ वर्षापासून आयकर भरला नसाल आणि तुमच्या बँक खात्यातून २० लाख ते १ कोटी इतकी रक्कम काढण्यात आली असेल तर त्यावर २ टक्के इतका टीडीएस द्यावा लागेल. जर रक्कम १ कोटी पेक्षा अधिक असेल तर ५ टक्के टीडीएस लागेल. ज्यांनी गेल्या ३ वर्षापासून आयकर भरला आहे त्यांना १ कोटी रक्कमेवर टीडीएस लागू होणार नाही.

बँक आणि पोस्ट ऑफिसमधून काढण्यात येणाऱ्या रक्कमेच्या आकडेवारीवरून सीबीडीटीने म्हटले आहे की, असे अनेक नागरिक आहेत जे मोठी रक्कम बँकेतून काढतात. पण कधीच इनकम टॅक्स रिटर्न भरत नाहीत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here