भारतीय संघासाठी एक धक्कादाय बाब पुढे आली आहे. भारतीय संघाच्या डॉक्टरनांच आता करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भारतीय संघातील खेळाडूंचीही करोना चाचणी करावी लागणार आहे. या सर्व खेळाडूंबरोबर असलेल्या डॉक्टर अमोल पाटील यांना आता करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

वाचा-

पटियाला येथे भारतीय बॉक्सिंग संघाचे शिबिर भरवण्यात आले होते. या शिबीरात ११ खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंमध्ये आशिया क्रीडा स्पर्धेतील विजेता आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अमित पांघलचाही समावेश होता.

पटियाला येथील नॅशनस इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. येथे हे डॉक्टर यायचे आणि काही जणांना भेटायचे. पण त्यांना तब्येतीमध्ये काहीतरी फरक झाल्याचे जाणवले आणि त्यांनी आपली करोना चाचणी करून घेतली. यामध्ये हे डॉक्टर करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता त्यांना राज्यातील करोनाच्या सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांची उद्या प्राथमिक चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या व्यक्तींना सात दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येणार आहे.

वाचा-

भारतीय संघाचे डॉक्टर करोना पॉझिटीव्ह आल्यावर खेळाडूंचीही करोना चाचणी घेण्यात आली होती. पण त्यामध्ये हे सर्व खेळाडू निगेटीव्ह सापडलेले होते. पण उद्या या सर्व खेळाडूंची एक प्राथमिक वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच खेळाडूंबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पण या सर्व खेळाडूंना आता खबरदारीचा उपाय घ्यावा लागणार आहे.

वाचा-

करोनाबाधित झालेले डॉक्टर हे भारतीय संघाबरोबर २०१८ सालापासून आहेत. २०१८ साली राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती, तेव्हा ते भारतीय संघाबरोबर जोडले गेले होते. गेल्या वर्षी झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही हेच डॉक्टर भारतीय संघाबरोबर कायम होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here