वाचा-
वर्ल्ड कप २०१९च्या फायनलमध्ये प्रथम ५०-५० षटकात सामन्याचा निकाल लागला नाही. त्यानंतर झाली तेव्हा देखील दोन्ही संघांच्या धावा समान झाल्या. पण इंग्लंडच्या संघाला विजयी घोषित करण्यात आले. इंग्लंडने न्यूझीलंडला शून्य धावांनी हरवले. कारण क्रिकेटमध्ये विजयाचा निर्णय फक्त धावा किंवा विकेटनी होतो.
सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने सर्वाधिक चौकार मारल्यामुळे त्यांना विजेतेपद देण्यात आले. इंग्लंड संघाने प्रथमच वर्ल्ड कप जिंकला तो ही घरच्या मैदानावर. इंग्लंड संघाने धावा किंवा विकेटच्या जोरावर नव्हे तर चौकारांच्या जोरावर सामना जिंकला.
वाचा-
अंतिम सामन्यात इंग्लंडने २२ चौकार मारले ज्यातील दोन सुपर ओव्हरमधील होते. तर न्यूझीलंडने १४ चौकार मारले त्यातील एक सुपर ओव्हरमधील होता. त्यामुळेच आयसीसीने इंग्लंडला विजेतेपद दिले. आयसीसीने २०११च्या वर्ल्ड कपमध्येच हा निर्णय घेतला होता की, जर नॉक आउट सामना टाय झाला तर सुपर ओव्हरमध्ये विजेते ठरवला जाईल. त्याच बरोबर सुपर ओव्हर देखील टाय झाली तर चौकाराच्या आधारावर विजेता ठरवला जाईल. २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये याच नियमाने इंग्लंडला विजेतेपद मिळून दिले.
वाचा-
२०१९च्या अंतिम सामन्यानंतर आयसीसीच्या या नियमावर जोरदार टीका झाली. त्यानंतर आता हा नियम बदलण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत जर सामना टाय झाला तर तो सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जाईल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times