नवी दिल्ली: क्रिकेटच्या इतिहासात काही असे विक्रम आहेत जे मोडले जाणे अशक्य वाटतात. असे अशक्यप्राय विक्रम जसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाले आहेत तसेच ते प्रथम श्रेणी सामन्यात देखील झाले आहेत. प्रथम श्रेणी कसोटी सामन्यात () एका संघाने एका डावात तब्बल १ हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी या संघाने दोन वेळा केली. जाणून घेऊयात क्रिकेटमधील या अनोख्या विक्रमाबद्दल…

आंतरराष्ट्रीय (International Cricket) कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. लंकेने भारताविरुद्ध १९९७ साली एका डावात ६ बाद ९५२ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी सामन्याचा विचार केल्यास एका संघाने अशी कामगिरी केली आहे ज्याचा विचार करणे अशक्य आहे.

वाचा-
१९२३ साली संघाने तस्मानिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातील दुसऱ्या डावात १ हजार ५९ धावांचा डोंगर उभा केला. मेलबर्न मैदानावर झालेल्या या सामन्यात तस्मानियाने पहिल्या डावात फक्त २१७ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल व्हिक्टोरिया संघाने १ हजार ५९ धावा केल्या. व्हिक्टोरिया संघाकडून बिल पोंसफोर्डने ४२९ धावा केल्या. हा सामना व्हिक्टोरिया संघाने ६६६ धावांनी जिंकला.

वाचा-
त्यानंतर व्हिक्टोरिया संघाने १९२६ साली पुन्हा एकदा अशी कामगिरी केली. त्यांनी न्यू साउथ वेल्स विरुद्ध २४ ते २९ डिसेंबर १९२६ रोजी मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात १ हजार १०७ धावा केल्या. या सामन्यात बिल पोंसफोर्ड यांनी ३५२, जॅक राइडर २९५ धावा केल्या. व्हिक्टोरिया संघातील पहिल्या चार फलंदाजांनी ३ अंकी धावसंख्या केली होती. या सामन्यात व्हिक्टोरिया संघाने १ डाव आणि ६५६ धावांनी विजय मिळवला.

वाचा-
व्हिक्टोरिया संघाच्या नावावर हा विक्रम गेली ९७ वर्ष कायम आहे. प्रथम श्रेणी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विक्रम अद्याप कोणाला मोडता आला नाही. तर दुसरा विक्रम गेली ९४ वर्ष त्यांच्या नावावर आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here