करोनाच्या काळात घर चालवणे आणि सराव करणे हे चंदसाठी अवघड जात आहे. कारण तिला एका शूज बनवणाऱ्या कंपनीने प्रायोजकत्व दिले होते. पण ही गोष्ट वगळता सध्याच्या करोनाच्या काळात मात्र एकही प्रायोजक तिच्याबरोबर नाही. त्याचबरोबर कोणतीही स्पर्धाही सुरु नाही. त्यामुळे तिच्यावर ही वेळ आल्याचे पाहायला मिळते आहे. पण भारताच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर अशी वेळे येणे, हे आपल्या देशाचे दुर्देव आहे, असेही म्हटले जात आहे.
याबाबत चंद म्हणाली की, ” सध्याच्या घडीला माझ्याकडे सर्व पैसे संपले आहेत. त्याचबरोबर माझी मिळकतही काही नाही. त्यामुळे आता माझ्यापुढे गाडी विकण्यावाचून पर्यायच नाही. कारण सध्याच्या घडीला मला ऑलिम्पिकच्या सरावासाठी कोणीही प्रायोजक भेटलेले नाहीत. त्याचबरोबर अर्थाजन करण्याचे माझ्याकडे कोणतेही साधन नाही. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आहे.”
चंद पुढे म्हणाली की, ” माझ्याकडे एक गाडी आहे. ती विकण्याचा निर्णय मी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मी फेसबूकवर याबाबत पोस्टही केली होती. पण या पोस्टवर काही वाईट कमेंट यायला लागल्या त्यामुळे मला ही पोस्ट डिलीट करावी लागली. पण सध्याच्या घडीला मला जर घर चालवायचे असेल आणि ऑलिम्पिकचा सराव करायचा असेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.”
करोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे जर ऑलिम्पिकमध्ये खेळायचे असेल तर त्यासाठी सराव करणे भाग आहे. पण आता चंदवर ही वाईट वेळ आली आहे. यासाठी प्रायोजकांनी, सरकारने आणि क्रीडापटूंनी पुढे येऊन तिला मदत करायला हवी, असे चाहत्यांना वाटत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times