वाचा-
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट मालिका मार्चमध्ये खेळवण्यात आली होती. ही मालिका करोनामुळे रद्द करण्यात आली. त्यावेळी हं पंचही या मालिकेचा एक भाग होते. पण मालिका रद्द झाल्यावर मात्र ते उत्तर प्रदेश येथील आपल्या डांगरोल या गावात आले होते. त्यानंतर गावात आल्यावर त्यांना एक महत्वाची समस्या जाणवायला लागली. संपूर्ण गाव या परिस्थितीशी दोन हात करत होते. पण ही समस्य काही सुटता सुटत नव्हती.
वाचा-
डांगरोल या गावाचा संपर्क बऱ्याचदा तुटलेला पाहायला मिळायचा. कारण या गावात बऱ्याच सुविधांचा अभाव होता. गावात प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, पण झाडावर चढल्याशिवाय मोबाईलची रेंज यायची नाही. त्यामुळे संपूर्ण गावकरी हैराण होते. त्याचबरोबर गावातील विद्यार्थींनाही मोबाईलवरून अध्ययन करण्यात समस्या जाणवत होती. पण ही समस्या भारताचे आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांनी आता सोडवली आहे.
वाचा-
याबाबत पंच चौधरी म्हणाले की, ” आमच्या गावात बऱ्याच समस्या आहेत. आमच्या गावातून दिल्लीला थेट गाडीही जात नाही. त्याचबरोबर गावात सर्वांकडे मोबाईल आहेत, पण रेंज नाही. रेंज येण्यासाठी गावातील झाडांवर लोकं चढत होती. ही समस्या मी जाणवून घेतली आणि कसे सोडवता येईल ते पाहिले. आज गावामध्ये रेंज आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण गावकरी माझ्या घरी येऊन आभार मानत आहेत.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times