श्वास न घेता आल्यामुळे एका भारतीय पंचांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात शोकाकुल वातावरण आहे. एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये आज दुपारी त्यांचे निधन झाले.

अविक बासू असे निधन झालेल्या भारतीय पंचांचे नाव आहे. श्वास घेताना त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बासू यांची प्रकृती ढासळत असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पण आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वाचा-

अविक हे बऱ्याच जणांचे लाडके पंच होते. अवघ्या ४४ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटपटू, प्रशासक आणि क्रिकेटशी निगडीत काम करणाऱ्या व्यक्तींना एकच धक्का बसला आहे.

वाचा-

अविक हे घरामध्ये घसरून पडले होते. त्यानंतर त्यांच्या छातीच्या आजाराला गंभीर इजा झाली होती. काही काळ त्यांच्यावर घरातच उपचार करण्यात आले होते. पण त्यांची तब्येत ढासळत गेली आणि त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अविक यांना श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांची करोना चाचणीही घेण्यात आली होती. ही करोना चाचणी निगेटीव्ह आली होती. पण त्यानंतरही अविक यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here