शमी सोबतच्या नात्यात आलेल्या वादानंतर हसीना सोशल मीडियावर सक्रीय झाली. ती या व्हिडिओच्या माध्यमातून टीकाकारांना उत्तर देत असते. अनेक वेळा युझर्सनी शमीची बाजू घेत हसीनावर टीका केली. तेव्हा तेव्हा हसीना काही ना काही पोस्ट शेअर करून उत्तर देत असते.
वाचा-
आता हसीनाने जीममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हसीना सायकलिंग, लेग एक्सरसाइज असे जीम वर्कआउट करत आहे. या व्हिडिओच्या मागे ‘लडकी ब्यूटीफुल कर गई चूल’ हे हिंदी गाणं सुरू आहे. या गाण्यावर हसीनाने एक्सप्रेशन देखील दिल्या आहेत.
जीममधील व्हिडिओच्या आधी हसीनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिला घाबरवण्यासाठी कोणी तरी पाठवला होता. तिने तो इस्टाग्रामवर शेअर केला. तर अन्य एका फोटोमध्ये ती म्हणते, डेअर टू ड्रीम, डेअर टू ट्राय, डेअर टू फेल,डेअर टू सक्सीड!
वाचा-
आणि त्याची पत्नी हसीना जहाँ यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू आहेत. हे दोघे २०१८ पासून वेगवेगळे राहतात. हसीनाने शमीवर मॅच फिक्सिंग, अन्य महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच तिने घरगुती हिंसाचार प्रकरणी शमीविरुद्द तक्रार देखील दाखल केली होती. या दोघांना एक मुलगी आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times