सिडनी: या वर्षाच्या अखेरीस भारताचा बहुप्रतिक्षित असा ऑस्ट्रेलिया दौरा होणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याच्या काळातच ऑस्ट्रेलिया क्रिकटे बोर्डाने टी-२० लीग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या लीग स्पर्धेत ६१ सामने होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलाय.

ऑस्ट्रेलियाने बुधवारी बिग बॅश लीग (BBL) स्पर्धेच्या दहाव्या सत्राचे आयोजन करणार असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमानुसार ३ डिसेंबर रोजी अॅडलेड ओव्हल मैदानावर अॅडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात बीबीएलमधील पहिला सामना होईल. याच दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू होईल. बीबीएलची फायनल पुढील वर्षी म्हणजे २०२१ साली सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे.

वाचा-
महिला स्पर्धेत ५९ सामने होणार असून ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या काळात खेळवली जाईल.

या स्पर्धेच्या आयोजनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसारणकत्यांसोबत केलेला करार देखील पूर्ण करता येईल आणि त्यासाठी कोणताही दंड द्यावा लागणार नाही. अर्थात बुधवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकात बदल होण्याची देखील शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलियात काही नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक राज्यात लॉकडाउन आहे.

वाचा-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे बिग बॅश चीफ अॅलिस्टर डबसन यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. याचे पालन केले जाईल. तसेच खेळाडू आणि लोकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल.

वाचा-
काळात क्रिकेट कार्यक्रमाचे आयोजन करणे सोपी गोष्ट नाही. क्रिकेट स्पर्धेवर बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव पडू शकतो, असे ते म्हणाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here