ढाका: करोना व्हायरसची लागण झालेल्यामध्ये काही क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. जगभरात आतापर्यंत काही लाख लोकांचा जीव घेणाऱ्या करोनाच्या लढाईत अनेकांनी विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वी एका क्रिकेटपटूला करोनाची लागण झाली होती. आता त्याने करोनावर मात केली असून त्याचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे.

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरफी मुर्तजाने करोनावर मात केली आहे. गेल्या महिन्यात २० जून रोजी त्याला करोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मंगळवारी मुर्तजाने करोनाची चाचणी नेगेटिव्ह आल्याची माहिती दिली.

वाचा-
तुम्ही सर्व जण ठीक असाल अशी अपेक्षा. देवाची कृपा आणि सर्वांनी केलेल्या प्रार्थनेमुळे करोना व्हायरसची चाचणी नेगेटिव्ह आली. मी त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी या कठीण काळात मला साथ दिली आणि माझ्या आरोग्यासाठी काळजी व्यक्त केली, असे मुर्तजाने म्हटले आहे.

जलद गोलंदाज असलेल्या मुर्तजाने सांगितले की, मी घरीच थांबून उपचार घेतले आणि करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलो. ज्यांना करोनाची लागण झाली आहे त्यांनी सकारात्मक राहण्याची गरज आहे. ईश्वरावर विश्वास ठेवावा आणि नियमांचे पालन करावे. आपण सर्वांनी मिळून या व्हायरस विरुद्ध लढायचे आहे, असे त्याने पोस्टमध्ये म्हटलय.

वाचा-

मुर्तजासह त्याची पत्नी सुमोनाला करोनाची लागण झाली होती. माझी पत्नी दोन आठवड्यांनी करोना पॉझिटिव्ह झाली. आता तिची प्रकृती चांगली आहे. तिच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा.

वाचा-
मुर्तजा सध्या बांगलादेशमधील सत्तधारी अवामी लीग पक्षाचा खासदार आहे. २० जून रोजी त्याला करोना झाल्याचे निदन झाले. बांगलादेशमधील अन्य दोन क्रिकेटपटू नफीस इकबाल आणि नजमुल इस्लाम यांना देखील करोनाची लागण झाली होती. ते दोघेही घरीच उपचार करून बरे झाले. इकबाल आणि इस्लाम हे ३ आठवड्यांपूर्वी करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.

मुर्तजाने बांगलादेशकडून २२० वनडे, ३६ कसोटी आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २००९ साली एक आयपीएल सामना खेळला. त्याने वनडेत ८ हजार ८९३ धावा आणि २७० विकेट , तर कसोटी ३ हजार २३९ धावा आणि ७८ विकेट घेतल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here