आयपीएल झाले नाही तर बीसीसीआयला चार हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या वर्षी कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्यासाी बीसीसीआय प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते आहे. कारण आयपीएल खेळण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आशिया चषक स्पर्धाही रद्द केलेली आहे. त्यामुळे आता एक महत्वाचा दौराही आयपीएलसाठी रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्या दौऱ्यावर इंग्लंडचा संघ सप्टेंबर महिन्यामध्ये येणार होता. पण या महिन्यात बीसीसीआय आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा भारताचा दौर रद्द करण्याचा निर्णय इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे, असे डेली मेल या वर्तमानपत्राने म्हटले आहे. त्यामुळे आता बीसीसीआय यावर काय निर्णय घेते, हेदेखील पाहावे लागणार आहे.
सध्याच्या घडीला बीसीसीआयचे सर्व लक्ष हे आयसीसीवर आहे. कारण आयसीसी काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेणार असल्याचे समजते आहे. करोना व्हायरसनंतर विश्वचषक खेळवायचा की नाही याचा विचार आयसीसी करत आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा मात्र त्यांनी केलेली नाही. विश्वचषक रद्द झाल्यावरच आयपीएल खेळवणे शक्य आहे. कारण आयपीएल आणि विश्वचषक या स्पर्धांना जास्त दिवस लागतात. त्यामुळे या दोनपैकी एकच स्पर्धा होऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे विश्वचषक रद्द झाल्यास आयपीएल खेळवले जाऊ शकते. पण विशअवचषक जर खेळवण्याच निर्णय आयसीसीने घेतला तर बीसीसीआयपुढे मोठी समस्या उभी राहू शकते. त्यासाठी आता आयसीसी नेमकी काय निर्णय घेते, यावर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times