सध्याच्या घडीला करोना व्हायरसने सर्वच जण त्रस्त आहे. करोना व्हायरसमुळे घरात जवळपास सर्वच ४ महिन्यांपासून बसलेले आहेत. त्यामुळे आता काही गोष्टी करण्यासाठी लोकं घराबाहेर पडायला लागली आहेत. काही दिवसांमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या साक्षीने क्रिकेटचे सामने सुरु होणार होते. पण हे सामने काही दिवसांवरच येऊन ठेपलेले असताना सहा जणांना करोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आलेली आहे.

क्रिकेट सामना काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही गोष्ट समोर आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पण आता हे सामने खेळवायचे की नाही, याचा विचारही क्रिकेट मंडळाला करावा लागणार आहे. कारण एकाच ठिकाणाहून सहा जणांना करोना होणं, ही धक्कादायक गोष्ट आहे. या सामन्यांबाबत आता काय निर्णय घेतला जातो. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं घडले तरी काय…
करोनामुळे क्रिकेट ठप्प झालेले होते. पण काही तरी क्रिकेट सुरु व्हायला हवे, यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने ठरवले आणि एक अनोखी संकल्पना शोधून काढली. त्यांनी एकच सामना तीन संघांबरोबर खेळायचे ठरवले आहे. या संघांचे कर्णधारपद ए बी डी’व्हिलिअर्स, कागिसो रबाडा आणइ क्विंटन डीकॉक यांना देण्यात आले आहे. या सामन्याची तयारी सुरु असताना गेल्या तीन दिवसांत काही जणांच्या करोना चाचणी घेण्यात आल्या. या चाचणीनंतर सामन्याशी निगडीत असलेल्या सहा जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने या सहा जणांची नावे सांगितलेली नाहीत.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने यावेळी सांगितले की, ” आमचा सामना १८ जुलैला खेळवला जाणार आहे. त्यामुळे आम्ही १०-१३ जुलै या कालातवधीमध्ये करोनाची चाचणी केली होती. यामध्ये सहा जणांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या सहा जणांमध्ये कोणताही खेळाडू नाही.”

करोनाबरोबरच आता आपले आयुष्य सुरु ठेवायचे आणि काम करायचे, असे काही जणांनी ठरवलेले आहे. त्यामुळे आता त्या गोष्टीला पर्याय नाही. कारण काही जणांना गेल्या काही महिन्यांमध्ये पगारही मिळालेला नाही. त्यांच्यासाठी काही व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यापासून इंग्लंडमध्ये क्रिकेटही सुरु करण्यात आलं आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here