करोनामुळे काही नियम सर्वांनाच लागू आहेत. त्यामुळे बहुतांशी लोकं आपल्या घरातच आहेत. पण घरामध्ये राहूनच सचिनने आज पावसाचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सचिनच्या घरात एक मोठा बगिचा आहे. तिथे सचिन पावसाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. सचिन यावेळी काळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये आहे आणि आकाशातून पडणारा पाऊस तो आपल्या चेहऱ्यावर झेलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा-
सचिन पावसाचा आनंद घेत असताना त्याचा व्हिडीओ काढला आहे तो त्याची मुलगी साराने. सचिन जेव्हा पावसाचा आनंद लूटत होता. तेव्हा सारा ही बाल्कनीमध्ये होती. सचिन पावसाचा आनंद नेमका कसा लुटत आहे, हे या व्हिडीओमध्ये तिने टिपलेले आहे. या व्हिडीओमध्ये सचिनने कसा पावसाचा आनंद लुटला ते पाहायला मिळत आहे.
वाचा-
सचिनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी सचिनने व्हिडीओ पोस्ट केल्यावर त्याखाली म्हटले आहे की, ” पावसाळा आला की मला माझ्या लहानपणीची आठवण येते. त्यामुळे पावसाचे थेंब झेलायला मला आवडते. माझी आवडती कॅमेरामन असलेल्या साराने हा व्हिडीओ टिपलेला आहे. या व्हिडीओमध्ये पावसाचा मनमुराद आनंद मी लुटताना तुम्हाला पाहायला मिळेल.”
वाचा-
करोनाबरोबरच आता आपले आयुष्य सुरु ठेवायचे आणि काम करायचे, असे काही जणांनी ठरवलेले आहे. त्यामुळे आता त्या गोष्टीला पर्याय नाही. कारण काही जणांना गेल्या काही महिन्यांमध्ये पगारही मिळालेला नाही. त्यांच्यासाठी काही व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यापासून इंग्लंडमध्ये क्रिकेटही सुरु करण्यात आलं आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times