दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या ए बी डी’व्हिलिअर्सची पत्नी डॅनियल ही गर्भवती आहे. त्यामुळे लवकरच डी’व्हिलिअर्सच्या घरी नव्या बाळाचा जन्म होणार आहे.
वाचा-
डी’व्हिलिअर्सची पत्नी डॅनियलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती गर्भवती असल्याचे दिसत आहे. या फोटोखाली हॅलो बेबी गर्ल, असे डॅ़नियलने म्हटले आहे. डी’व्हिलिअर्सला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यामुळे आता तिसरं पत्य त्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला येणार आहे.
वाचा-
काही महिन्यांपूर्वी डी’व्हिलिअर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो आपल्या कुटुंबियांना वेळ देत होता. पण संघात पुनरागमन करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली होती. पण सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे क्रिकेट ठप्प आहे. त्यामुळे त्याला आता संघात पुनरागमन करण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार आहे.
वाचा-
आतापर्यंत डी’व्हिलिअर्सने एक क्रिकेटपटू म्हणून जगभरात नाव कमावले आहे. धडाकेबाज फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक, अशी त्याची क्रिकेट विश्वात ख्याती आहे. त्याचबरोबर बऱ्याच सामन्यांमध्ये त्याने यष्टीरक्षणही केले होते. त्याचबरोबर सर्वात जलद शतकही त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ठोकले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये डी’व्हिलिअर्स हा देशाकडून खेळत नसला तरी आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत होता. डी’व्हिलिअर्सने आयपीएलमध्ये सीमारेषेवर पडकलेला झेल अजूनही चाहत्यांचा चांगलाच लक्षात आहे. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळए आयपीएल पुढे ढकलली आहे. त्यामुळे यवर्षी आयपीएल होणार की नाही, याबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times