वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. आता उद्यापासून या दोन्ही संघामध्ये दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. पण दुसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार तुम्हाला बदललेला पाहायला मिळाला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण पहिल्या पराभवानंतर इंग्लंडने आपला कर्णधारच बदलल्याचे पाहायला मिळाले आहे.

पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचे कर्णधारपद अष्टपैलू बेन स्टोक्सकडे देण्यात आले होते. या सामन्यात इंग्लंडला वेस्ट इंडिजकडून चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. आता उद्यापासून या दोन्ही संघामध्ये दुसरा सामना रंगणार आहे आणि या लढतीत इंग्लंडचे कर्णधारदप जो रूटकडे सोपवण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी जो रुटच्या पत्नीने दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे रुटने विश्रांती घेत आपल्या पत्नीबरोबर राहणेच पसंत केले होते. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रुट इंग्लंडच्या संघात पुनरागमन करणार असून तोच इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर क्रिकेटचे पुनरागमन गेल्या आठवड्यात झाव्याचे आपल्याला पाहायला मिळाले. करोना व्हायरसमुळे ठप्प झालेले क्रिकेट पुन्हा एकदा सुरू झाले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने चार गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक कौतुक कोणाचे झाले असेल तर वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर याचे होय. या सामन्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत होल्डरने अशी कामगिरी केली आहे जी गेल्या २० वर्षात कोणत्याही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाला करता आली नाही. त्यामुळे या विजयानंतर वेस्ट इंडिजला चांगलाच फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये होल्डर दुसऱ्या स्थानवर पोहोचला आहे. करिअरमधील हे त्याचे सर्वोच्च स्थान असून वेस्ट इंडिजद्वारे गेल्या २० वर्षात कोणत्याही गोलंदाजाला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचता आले नाही. होल्डरने पहिल्या डावात ४२ धावा देत ६ विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. क्रमवारीत होल्डरने ८६२ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. याआधी ऑगस्ट २००० साली कर्टनी वॉल्शने क्रमवारीत ८६६ गुण मिळवले होते. या क्रमवारीत पहिल्या दहा जणांमध्ये फक्त एक भारतीय गोलंदाज आहे. भारताचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह सातव्या स्थानावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here