कोलकाता: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (BCCI) बुधवारी होम क्वारंटाइनमध्ये गेला आहे. गांगुलीचा मोठ्या भावाला कोरना व्हायरसची लागण झाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब)चे संयुक्त सचिव यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

वाचा-
बंगालच्या रणजी संघाकडून खेळणारे स्नेहाशीष यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅबच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप होता. आज (बुधवारी) त्यांची करोना चाचणी घेण्यात आली. त्याचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर स्नेहाशीष यांना रुग्णालया दाखल करण्यात आले.

वाचा-
बुधवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला. त्यानंतर नियमानुसार गांगुलीने होण्याचा निर्णय घेतल्याचे एका निकटवर्तीयाने सांगितले. या संदर्भात गांगुलीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फक्त गांगुलीच नाही तर त्याच्या कुटुंबातील सर्व जण होम क्वारंटाइन झाले आहेत. गांगुली आणि स्नेहाशीष एकाच घरात वेगवेगळ्या फ्लोअरवर राहतात. याआधी जून महिन्यात स्नेहाशीष यांना कोरना झाल्याचे वृत्त आले होते. पण ते वृत्त चुकीचे होते. पण यावेळी स्नेहाशीष यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा-
स्नेहाशीष यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गांगुलीसह बंगाल क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अभिषेक डालमिया यांनी देखील स्वत:हून होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. स्नेहाशीष यांना कधी भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कोलकाता आणि बंगालकडून ते ५९ रणजी सामने खेळले आहेत. फलंदाजीसोबत ते ब्रेक गोलंदाजी देखील करत. फलंदाज म्हणून त्यांनी ५९ प्रथम श्रेणी सामन्यात २ हजार ५३४ धावा केल्या. ज्यात ६ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणीत त्यांनी १५८ ही सर्वोच्च खेळी केली आहे.

स्नेहाशीष यांनी १९८८ ते १९९७ या काळात १८ लिस्ट ए सामने खेळले. पण वनडेत त्यांची कामगिरी फार चांगली झाली नाही. १८ सामन्यात त्यांना फक्त २७५ धावाच करता आल्या. गोलंदाज म्हणून ते प्रथम श्रेणी अथवा लिस्ट ए मध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here