नवी दिल्ली: वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान ( in World Cup) यांच्यात आतापर्यंत जितके सामने झाले आहेत त्यापैकी सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा एकही सामना गमवलेला नाही. १९९२ पासून सुरू झालेला हा सिलसिला आजपर्यंत कायम आहे. जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा क्रिकेट चाहत्यांसाठी ती एक मोठी पर्वणी असते. हे दोन्ही संघ जेव्हा मैदानात भिडतात तेव्हा अनेक वेळा खेळाडूंमध्ये टशन होते. भारत -पाक यांच्या सामन्यातील अशाच एका घटनेबद्दल सांगत आहे माजी क्रिकेटपटू…

वाचा-
१९९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (1996 World Cup, India vs Pakistan) यांच्या लढतीत एक घटना घडली होती. पाकचा सलामीवीर याने भारताचा गोलंदाज () याला चिढवले होते. पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना आमिरने प्रसादच्या चेंडूवर कव्हर्सवर एक शानदार चौकार मारला. चौकार मारल्यानंतर सोहेलने प्रसादकडे पाहून इशारा केला की, मी अशाच पद्धतीने तुझ्या चेंडूवर चौकार मारेन. पण प्रसादने पुढच्या चेंडूवर सोहेलची बोल्ड घेतली आणि चोख उत्तर दिले.

भारतीय गोलंदाज आर. अश्विन याच्यासोबत बोलताना वेंकटेश प्रसादने १९९६च्या वर्ल्ड कपमधील त्या घटनेबद्दल सांगितले. जेव्हा सोहेलने माझ्या चेंडूवर चौकार मारला आणि इशारा करून सांगितले तेव्हा वाटले की कोणी तरी मला कानाखाली मारली आहे. सोहेलने केलेली स्लेजिंग माझ्यासाठी कानाखाली मारल्या प्रमाणे होती.

वाचा-

प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात सोहेलने बॅट आणि बोटाने इशारा करून सांगितले की, मी तुझ्या चेंडूवर अशाच पद्धतीने चौकार मारणार. तेव्हा मी त्याला काहीच बोलू शकलो नाही. त्या परिस्थितीत मी धैर्य आणि संयम सोडला नाही. त्या घटनेनंतर मी पुन्हा चेंडू टाकण्यासाठी गेले तेव्हा डोक्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. पण तेव्हा मी ठरवले की शांत रहायचे आणि इतकी वर्ष जे केले तेच करायचे.

वाचा-
प्रसादने सोहेलला पुढच्या चेंडूवर बाद केले आणि बदला घेतला. मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले, असे प्रसादने अश्विनला सांगितले.

१९९६च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा ३९ धावांनी पराभव केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मैदानावरील वादाचा उल्लेख जेव्हा जेव्हा होतो तेव्हा प्रसाद आणि सोहेल यांच्यातील या घटनेचा समावेश त्याच नक्कीच होतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here