करोना व्हायरसनंतर क्रिकेट खेळण्यासाठी आयसीसीने काही नियम बनवले आहेत. हे नियम मोडल्यास खेळाडूवर गंभीर कारवाई झाल्याचे आता पाहायला मिळत आहे. इंग्लंडच्या खेळाडूने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक नियम मोडला होता. त्यामुळे त्याला आता संघाबाहेर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याला आता करोनाच्या दोन चाचणी करणे अनिवार्य असल्याचे म्हटले जात आहे.

आयसीसीने करोना नंतर खेळण्यासाठी काही नवीन नियम बनवले आहेत. यामध्ये सोशल डिस्टस्टींग, चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी वापरता येणार नाही, असे काही नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर त्या खेळाडूला शिक्षा हाऊ शकते, असे आयसीसीने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार इंग्लंडच्या खेळाडूवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. करोनानंतर खेळाडूवर गंभीर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इंग्लंडला धक्का, या खेळाडूला केले संघाबाहेरवेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा प्रकाशझोतात आला होता. पण या सामन्यात आर्चरने आयसीसीचा नियम मोडला. त्यामुळे आता त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. कारण या सामन्यात इंग्लंडने जेम्स अँडरसन आण मार्क वूड या दोन वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली होती. त्यामुळे संघाची मदार आर्चरवर होती.कारण पहिल्या कसोटी सामन्यात आर्चरने नंत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे या सामन्यात तो खेळणार नसल्यामुळे इंग्लंडचे मोठे नुकसान होऊ शकते.

नेमके काय केले…आयसीसीचा सर्वात मोठा नियम आहे तो म्हणजे ‘बायो सिक्युअर’. या नियमाचे पालन इंग्लंडच्या आर्चरने केले नाही. त्यामुळे त्याला आता इंग्लंडच्या संघातून बाहेर केले आहे. आता आर्चरला पाच दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. यामध्ये आर्चरच्या दोनदा करोनाच्या चाचण्या होतील. या चाचण्यांमध्ये आर्चर निगेटीव्ह आला तरच त्याला पुढच्या सामन्यांमध्ये खेळता येऊ शकते. याप्रकरणाची पूर्ण माहिती वेस्ट इंडिजच्या संघालाही देण्यात आली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here