करोनानंतर तब्बल चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. पण फक्त दोन देशांमध्येच हे सामने होत आहेत. कारण बाकीच्या काही संघांना मैदानात उतरणे जोखमीचे वाटत आहे. चार महिने क्रिकेट पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे ते सुरु करणे काही देशांना महत्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजपासून तुम्हाला क्रिकेटचा लाईव्ह सामना पाहता येणार आहे.
आज दुपारी ३.३० मिनिटांनी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पण हा दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंडला एक मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही संघांतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर चार विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करणार का, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा प्रकाशझोतात आला होता. पण या सामन्यात आर्चरने आयसीसीचा नियम मोडला. त्यामुळे आता त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. आयसीसीचा सर्वात मोठा नियम आहे तो म्हणजे ‘बायो सिक्युअर’. या नियमाचे पालन इंग्लंडच्या आर्चरने केले नाही. त्यामुळे त्याला आता इंग्लंडच्या संघातून बाहेर केले आहे. आता आर्चरला पाच दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. यामध्ये आर्चरच्या दोनदा करोनाच्या चाचण्या होतील. या चाचण्यांमध्ये आर्चर निगेटीव्ह आला तरच त्याला पुढच्या सामन्यांमध्ये खेळता येऊ शकते.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. कारण या सामन्यात इंग्लंडने जेम्स अँडरसन आण मार्क वूड या दोन वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली होती. त्यामुळे संघाची मदार आर्चरवर होती.कारण पहिल्या कसोटी सामन्यात आर्चरने नंत्रदीपक कामगिरी केली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times