कपिल देव यांची १९८३ साली विश्वचषक जिंकला आणि भारती क्रिकेटला संजीवनी मिळाली. यापूर्वी भारतीय संघाला कोणीही गंभीरपणे घेत नव्हते. पण या विश्वविजयानंतर भारताची पत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा विश्वचषक भारतासाठी फार मोलाचा ठरला होता. कपिल देव यांच्यासारखा कर्णधार भारतीय संघाला मिळाला होता.
वेस्ट इंडिजसारख्या दिग्गज संघाला भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नमवले होते. या सामन्यात कपिल देव यांनी जो एक अप्रतिम झेल घेतला, तो विजयासाठी मोलाचा ठरला होता. कारण हा झेल होता व्हिव रीचर्ड्ससारख्या धडाकेबाज फलंदाजाचा. कपिल देव यांची झेल टिपला आणि भारताच्या हातात विश्वचषक आला, असे त्यावेळी म्हटले गेले होते. पण कपिल देव हे क्रिकेटपटू झाले तरी कसे, हे त्यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
कपिल यांनी नेमके काय सांगितले पाहा…एका मुलाखतीमध्ये आपण वेगवान गोलंदाज कसे होऊ शकलो, हा किस्सा दस्तुरखुद्द कपिल यांनीच सांगितला आहे. कपिल म्हणाले की, ” क्रिकेटपटूंसाठी बऱ्याचदा शिबीरांचे आयोजन केले जाते. त्यावेळी एका शिबीरामध्ये मी सराव करत होतो. त्यावेळी तिथे एक अधिकारी होते, त्यांच्याबरोबर माझा वाद झाला होता. त्यांनी मला रागात येऊन विचारले की, तु नेमकं काय करतोस? त्यावेळी मी त्यांना सांगितले की, मी वेगवान गोलंदाजी करतो. त्यावेळी त्यांनी सांगितले की, भारतामध्ये आतापर्यंत कोणताही वेगवान गोलंदाज तयार झालेला नाही. या अधिकाऱ्यांची ही गोष्ट माझ्या मनाला लागली. त्यामुळेच मी वेगवान गोलंदाज होईल आणि सर्वांना दाखवून देईन, असा मनाशी निग्रह केला होता. त्यामुळेच मी वेगवान गोलंदाज होऊ शकलो.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times