पाकिस्तानमधून इंग्लंडला जाण्यापूर्वी क्रिकेटपटूंची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी हा खेळाडू निगेटीव्ह सापडला होता. यावेळी पाकिस्तानचे करोना निगेटीव्ह असलेल्या तीन खेळाडूंना इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले होते. इंग्लंडमध्ये या तिन्ही खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. पहिल्यांदा झालेल्या चाचणीमध्ये हे तिन्ही खेळाडू करोना निगेटीव्ह आले होते. पण त्यानंतर झालेल्या चाचणीमध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू काशिफ भट्टी हा पॉझिटीव्ह सापडल्याचे पाहायला मिळाले आहे.
पाकिस्तानच्या करोना चाचण्यांबाबत प्रश्नचिन्ह…काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या १० खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. पाकिस्तानसाठी ही सर्वात धक्कादायक गोष्ट होती. पण जेव्हा या १० खेळाडूंमधील मोहम्मद हाफिझने खासगीपणे आपली करोना चाचणी केली तेव्हा तो करोना निगेटीव्ह आला होता. त्यामुळे पाकिस्तानमधील करोना चाचण्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण पाकिस्तानमधील चाचण्या योग्यपद्धतीने केल्या जातात का, याबाबत आता सवाल विचारले जात आहेत.
दौरा रद्द होण्याचे संकटइंग्लंडमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा हा खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडल्याने इंग्लंड त्यांचा दौरा रद्द करू शकते, असेही म्हटले जात आहे. कारण यापूर्वी पाकिस्तानचे १० खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामध्ये आता तर एक खेळाडू पाकिस्तानमध्ये निगेटीव्ह होता आणि तो इंग्लंडमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या खेळाडूंमुळे इंग्लंडमध्ये धोका वाढू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा इंग्लंडचा दौरा रद्द होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरु झालेली आहे. वेस्ट इंडिजबरोबरच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता. पण आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times