दुसरा कसोटी सामना होण्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला. नियम मोडल्यामुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघाबाहेर काढण्यात आले. आयसीसीचा सर्वात मोठा नियम आहे तो म्हणजे ‘बायो सिक्युअर’. या नियमाचे पालन इंग्लंडच्या आर्चरने केले नाही. हा नियम नेमका आहे तरी काय, हे तुम्हाला माहिती नसेल. त्यामुळे आर्चरने नेमका कसा नियम मोडला ते पाहा…

करोनानंतर क्रिकेट खेळण्यासाठी आयसीसीने काही नवीन नियम बनवले आहेत. यामध्ये सोशल डिस्टस्टींग, चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी वापरता येणार नाही, असे काही नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर त्या खेळाडूला शिक्षा हाऊ शकते, असे आयसीसीने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार इंग्लंडच्या खेळाडूवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना सुरक्षित वातावरण बनवण्यात आले आहे. जेणेकरून खेळाडू आणि पंचांना कोणताही त्रास होऊ नये आणि क्रिकेटमध्ये पुन्हा खंड पडू नये. यासाठी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने एक नवा फंडा बनवला आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने जैव-सुरक्षित असे वातावरण बनवले आहे आणि त्याचे काही नियम बनवले आहेत. हेच नियम आर्चरने मोडले आणि त्याला संघाबाहेर काढण्यात आले आहे.

जैव-सुरक्षित वातावरण नेमके कसे बनवले…इंग्लंडमध्ये आता कसोटी सामना सुरु आहे. हा कसोटी सामना जैव-सुरक्षित वातावरणात खेळवला जात आहे. जैव-सुरक्षित वातावरण राहण्यासाठी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने एक मशिन मागवली आहे. ही मशिन लावली की, व्हायरस, बॅक्टेरिया आणि सुक्ष्म जीवांचे संक्रमण रोखले जाऊ शकते. त्यामुळेच इंग्लंडमध्ये सुरु असलेले सामने हे जास्त सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहेत.

जैव-सुरक्षित वातावरणाचे काय आहेत नियम…जैव-सुरक्षित वातावरण तयार करताना इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने काही नियम बनवले आहेत. या नियमांनुसार तुम्ही मैदानात कुठेही फिरी शकत नाहीत. त्याचबरोबर तुम्ही कोणाच्याही संपर्कात येता कामा नये. त्याचबरोबर खेळाडूंची हॉटेलमधील रुम आणि मैदानापर्यंतचा प्रवास हा पूर्ण सॅनिटराइज करण्यात येतो. या नियमांचे पालन आर्चरने केले नाही आणि त्यामुळेच त्याला संघाबाहेर जावे लागले आहे. आता आर्चरला पाच दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. यामध्ये आर्चरच्या दोनदा करोनाच्या चाचण्या होतील. या चाचण्यांमध्ये आर्चर निगेटीव्ह आला तरच त्याला पुढच्या सामन्यांमध्ये खेळता येऊ शकते. याप्रकरणाची पूर्ण माहिती वेस्ट इंडिजच्या संघालाही देण्यात आली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here