भट्टीला पाकिस्तानमध्ये असताना करोना पॉझिटीव्ह सापडला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार केले गेले. त्यानंतर करण्यात आलेल्या दोन चाचण्यांमध्ये तो निगेटीव्ह सापडला होता. त्यामुळे त्याला इंग्लंडच्या दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये जेव्हा भट्टीची पहिली चाचणी घेण्यात आली तेव्हा तो करोना पॉझिटीव्ह सापडला होता. त्यामुळे त्याला संघाबरोबर जाण्यास परवानगी दिली नव्हती. पण त्यानंतर त्याच्या दोन करोना चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यामध्ये तो निगेटीव्ह सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच आता त्याला संघाबरोबर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भट्टी हा आता पाकिस्तानच्या संघाबरोबर इंग्लंडमध्ये राहणार आहे.
याबाबत इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ” करोना संक्रमणचा प्रभाव या खेळाडूवर पहिली चाचणी करताना होता. त्यामुळेच भट्टीला आम्ही क्वारंटाइन केले होते. पण त्यानंतर घेण्यात आलेल्या चाचणीत तो निगेटीव्ह सापडला आहे. त्यामुळे त्याच्यामुळे आता कोणाला धोका नसून आम्ही त्याा संघाबरोबर पाठवत आहोत.”
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या १० खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. पाकिस्तानसाठी ही सर्वात धक्कादायक गोष्ट होती. पण जेव्हा या १० खेळाडूंमधील मोहम्मद हाफिझने खासगीपणे आपली करोना चाचणी केली तेव्हा तो करोना निगेटीव्ह आला होता. त्यामुळे पाकिस्तानमधील करोना चाचण्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण पाकिस्तानमधील चाचण्या योग्यपद्धतीने केल्या जातात का, याबाबत आता सवाल विचारले जात आहेत. करोनाची चाचणी नेमकी कशी केली जाते, हा प्रश्न सध्याच्या घडीला ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एखादी व्यक्ती करोना पॉझिटीव्ह सापडल्यावर ती अन्य चाचणींवर निगेटीव्ह कशी सापडते, याचा उलगडा होताना दिसत नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times