T20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा भारताविरुद्ध (IND vs BAN) पराभव झाला. संघाच्या या पराभवानंतर नुरुल हसनने मोठा आरोप केला आहे. भारतीय संघाकडून विराट कोहलीने (Virat Kohli) फेक फिल्डिंग (Fake Fielding) केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट हातात बॉल नसतानाही थ्रो करत असल्याची अॅक्टिंग करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार ७व्या ओवरमध्ये झालेला. अक्षर पटेलच्या चेंडूवर लिटन दास डीप पॉइंटवर शॉट खेळला. इथे अर्शदीप सिंगने बॉल फिल्ड करुन थ्रो केला. दरम्यान, फलंदाजांनी दुसऱ्या रनसाठी धाव घेतली होती. विराट पॉइंटवर फिल्डिंग करत होता. जेव्हा बॉल त्याच्या बाजूने गेला त्यावेळी त्याने नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने थ्रो करण्याची अॅक्टिंग केली.

काय असते फेक फिल्डिंग?

फेक फिल्डिंग नियम आयसीसी लॉ ४१.५ मध्ये (What is fake Fielding In Cricket) येतो. यातील नियमानुसार, कोणताही फिल्डर जाणूनबुजून शब्दाने किंवा कृतीने कोणत्याही बॉलरचं लक्ष विचलित करण्याचा, फसवण्याचा किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल, तरे ते अयोग्य आहे. कलम ४१.५.२ नुसार, फिल्डरने हे जाणूनबुजून केलं आहे की नाही हे कोणत्याही एका अम्पायरने ठरवायचं असतं. जर फिल्डर दोषी आढळला, तर कायदा ४१.५.३ प्रभावी होतो.

टीमवर असा होतो परिणाम

कायदा ४१.५.३ नुसार, कोणत्याही फिल्डरने असं लक्ष विचलित करण्याचा, फसवणूक करण्याचा किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचं अंपायरच्या लक्षात आलं, तर तो लगेच कॉल करून बॉल डेड झाल्याचं घोषित करण्याचा संकेत देईल. त्यानंतर दुसऱ्या अंपायरला याबाबत लगेच सांगण्यात येईल. फेक फिल्डिंगसाठी (Punishment For Fake Fielding In cricket) शिक्षाही आहे. फेक फिल्डिंग केलं आणि अंपायरने पाहिल्यास संपूर्ण टीमला याची शिक्षा मिळते.

काय आहे शिक्षा?

फेक फिल्डिंगसाठी गोलंदाजी संघाला शिक्षा दिली (Punishment For Fake Fielding In cricket) जाते. नियम ४१.५.६ नुसार, फलंदाजी अर्थात बॅटिंग करणाऱ्या संघाला पेनल्टी म्हणून ५ रन देण्याची घोषणा अंपायरला करावी लागते. त्याशिवाय त्या बॉलवर झालेल्या धावाही बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतात. फेक फिल्डिंग केल्यानंतर यासाठी दिलेल्या शिक्षेमागे काही महत्त्वाची कारणंही आहेत. त्यानुसार नियम लागू करण्यात आले आहेत. हेही वाचा – अंपायरला भिडणाऱ्या शाकिबला विराटने रोखलं, नो-बॉलवर पाहा काय गोंधळ झाला Video

हा नियम कधी लागू झाला?

२०१७ मध्ये आयसीसीने फेक फिल्डिंगचा नियम आणला होता. एमसीसीचे क्रिकेट मॅनेजरचे नियम फ्रेजर स्टिवर्टने २०१७ मध्ये हा नियम आणण्यामागची कारणं सांगितली होती. फिल्डर हातात बॉल नसतानाही जाणूनबुजून बॉल हातात असल्याचं नाटक करतात, यामुळे बॅट्समनला पुढे रन्स घेण्यासाठी रोखलं जातं, हा नियम लागू करण्याचं हेच महत्त्वाचं कारण होतं. त्याशिवाय फेक फिल्डिंगमुळे बॅट्समन जखमी होण्याचाही धोका असतो.

पहिल्यांदा कोणाला मिळाली होती शिक्षा?

ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन फेक फिल्डिंगसाठी शिक्षा मिळणारा पहिला खेळाडू होता. तो देशांतर्गत ५० ओवर टूर्नामेंटमध्ये क्वींसलँडसाठी खेळत होता. त्याने फिल्डिंग करताना बॉल रोखण्यासाठी डाइव्ह मारली, पण त्याला बॉल थांबवता आला नाही. बॉल थांबला नसल्याने त्याने फेक फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला. लाबुशेनने बॉल हातात नसतानाही थ्रो करण्याची अॅक्टिंग केली. अंपायरने त्याची हीच चूक पकडली आणि दुसऱ्या टीमला ५ पेनल्टी रन मिळाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

348 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here