सेहवाग हा एक धडाकेबाज सलामीवीर होता, हे सर्वांनाच माहिती आहे. पण सेहवागला जर सलामी करायला मिळाली नसती तर त्याचे करिअर लवकर संपले, असते असे म्हटले जाते. सेहवाग सलामीला खेळायला लागल्यामुळेच तो पॉवर प्लेमध्ये मोठे फटके मारून संघाला जलदगतीने धावा करून द्यायचा. पण त्यासाठी सचिनने मोठा त्याग केल्याचे म्हटले जाते. नेमकी ही गोष्ट आहे तरी काय…
सचिन आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हे दोघे सलामीला यायचे. त्यानंतर सेहवाग हा संघात आला. आता सेहवागला नेमके खेळवायचे तरी कुठे, हा प्रश्न गांगुलीला पडलेला होता. कारण सेहवाग जर सलामीला आला नाही तर भारताच्या धावा कमी होऊ शकतात, अशी भिती त्यावेळी गांगुलीला वाटली होती.
भारताचा एक माजी क्रिकेटपटू अजय रात्राने या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. कारण ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा अजय हा संघात होता आणि त्याने नेमका काय बदल झाला आणि कसा झाला हे त्याने पाहिले होते. त्यामुळे त्यावेळी नेमके काय झाले हे अजयने यावेळी सांगितले आहे.
याबाबत अजय म्हणाला की, ” गांगुली आणि सचिन हे डावाची सुरुवात करत असताना सेहवागला सलामीला आणायचा तरी कसा, हा विचार संघ व्यवस्थापन करत होती. त्यानंतर गांगुलीने सचिनला एक विनंती केली. गांगुलीने सचिनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची विनंती केली. कारण त्यामुळे सेहवागलाही सलामीला यायला मिळाले असते आणि संघातील चौथा क्रमांक हा अनुभवी फलंदाजाला देण्यात येतो. त्यामुळे सचिनला चौथ्या क्रमाकांवर खेळण्याची विनंती करण्यात आली होती. ही विनंती मान्य करून सचिनने सेहवागसाठी सलामीच्या स्थानाचा त्याग केला होता.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I always was concerned in this topic and stock still am, regards for posting.