विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट २०१३ मध्ये झाली होती. दोघांनी एका शॅम्पू ब्रँडसाठी जाहिरात केली होती. यावेळी विराटने क्रिकेट जगात आपली ओळख निर्माण केली होती. अनुष्काही बॉलिवूडमध्ये चांगल्या उंचीवर पोहोचली होती. दोघांची पहिली भेट तितकीशी खास नव्हती. विराट जाहिरातीच्या शूटिंगसाठी अतिशय नर्वव्ह होता, त्याचवेळी त्याने अनुष्काच्या हाय हिल्सवर पाय दिला होता आणि अनुष्का विराटवर चिडली होती. या जाहिरातीच्या शूटिंगनंतर विराट – अनुष्काच्या भेटी वाढू लागल्या आणि दोघांमध्ये प्रेमही वाढू लागलं, पण या दोघांनी विराट-अनुष्का हे नातं सिक्रेट ठेवलं. विराट-अनुष्का अनेकदा एकत्र दिसू लागले आणि दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या, पण दोघांनीही सुरुवातीला या चर्चा फेटाळून लावल्या.

पहिल्याच भेटीत घाबरला होता विराट

विराट कोहलीने एका मुलाखतीमध्ये सांगतिलं होतं, की अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीत तो अतिशय नर्व्हस होता. अनुष्काला पाहून तो घाबरला होता. नर्व्हसनेस कमी करण्यासाठी त्याने एक जोकही मारला, पण त्याने माहौल अधिकच बिघडला. जाहिरातीच्या शूटिंगवेळी अनुष्का विराटहून उंच दिसत होती. विराटनेही उंच हिल्स घातल्या होत्या. त्यावेळी विराटने तिला तु जास्तच मोठ्या हिल्स घातल्या असल्याचं म्हटलं. हे ऐकून अनुष्का चिडलीही होती, पण त्यानंतर मौहाल ठिक झाला आणि दोघांमध्ये चांगली मैत्रीही झाली.

फ्लाइंग किस देत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब

एका मॅचदरम्यान विराटने अर्थशतक केल्यानंतर, आपल्या बॅटने अनुष्काला फ्लाइंग किस देत विराटने दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. विराट-अनुष्काच्या नात्यात एक वेळ अशीही वेळ आली होती, ज्यावेळी दोघेही वेगळे होण्याच्या मार्गावर होते. २०१६ मध्ये विराटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने hartbroken असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर विराट आणि अनुष्का एकत्र दिसणंही बंद झालं होतं. त्यामुळे दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं, पण असं झालं नाही.

सिक्रेटली केलं लग्न

या चर्चांनंतर काही दिवसांत या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का डान्स करताना दिसत होते. हा व्हिडिओ युवराज आणि हेजल कीच यांच्या लग्नातील होता. विराट अनुष्काने ज्याप्रमाणे आपलं नात लपवून ठेवलं होतं, त्याचप्रमाणे त्यांचं लग्नही सिक्रेटली झालं. हेही वाचा – Virat Kohli: विराट दिवसाला कमावतो ६ लाख; अनुष्काही मागे नाही; सेलिब्रिटी कपलची संपत्ती किती?

२०१७ मध्ये लग्न

२०१७ मध्ये विराट-अनुष्का लग्न करणार असल्याचं समोर आलं. ११ डिसेंबर २०१७ मध्ये या दोघांनी इटलीत लग्न केलं. इटलीतील टसकनीमध्ये त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. विरुष्का आता एका मुलीचे आई-वडिल असून त्यांनी आपली मुलगी वामिकाला मीडिया, लाइमलाइटपासून दूर ठेवलं आहे.

विराट नेटवर्थ

विराटचं एकूण नेटवर्थ जवळपास १२७ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १०४६ कोटी रुपये आहे. विराट इन्स्टाग्रामवर सर्वात पॉप्युलर सेलेब्रिटी लिस्टमध्ये सामिल आहे. त्याचे इन्स्टावर २२० मिलियन फॉलोअर्स आहेत. कोहली आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी जवळपास ८.९ कोटी रुपये चार्ज करतो. विराटची वार्षिक कमाई १५ कोटींच्या जवळपास आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here