अॅडलेड : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात नेदरलँडच्या संघाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला आहे. या पराभवासह आफ्रिकेचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नेदरलँडच्या या विजयाने बांग्लादेश आणि पाकिस्तानलाही मोठा दिलासा मिळाला असून या दोन्ही संघांच्या सेमीफायनलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. सलामीवीर स्टीफन मायबर्ग आणि मॅक्स ओ डाऊन यांनी सुरुवातीला चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागेदारी केली. त्यानंतर मार्करमने मायबर्गला ३७ धावांवर बाद करत नेदरलँडला पहिला धक्का दिला. तसंच मॅक्स ओ डाऊन हादेखील २९ धावांवर बाद झाला. मात्र टॉम कूपने १९ चेंडूंत ३५ धावा, तर कॉलिन एकरमॅन याने २६ चेंडूंत ४१ धावा फटकावत नेदरलँडला १५८ एवढी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

भारताची एक चूक आणि थेट वर्ल्ड कपमधून बाहेर? ‘जायंट किलर’ ठरलेल्या झिम्बाब्वेकडून होऊ शकतो दगाफटका

दरम्यान, नेदरलँडने दिलेलं १५९ धावांचं आव्हान गाठण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ अपयशी ठरला. आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत १४५ धावाच करता आल्या. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. तसंच आफ्रिकेच्या संघावरील चोकर्स हा शिक्काही आणखी गडद झाला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

  1. When I read an article on this topic, casinosite the first thought was profound and difficult, and I wondered if others could understand.. My site has a discussion board for articles and photos similar to this topic. Could you please visit me when you have time to discuss this topic?
    b

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here