ॲडलेड: यंदाच्या विश्वचषकातीळ सुपर १२ मधील लाखेचे सामने सध्या खेळवले जात आहेत. टी-२० विश्वचषकासाठीच्या उपांत्य फेरीची समीकरणं खूपच बदलताना दिसत आहेत. आज भारताचा सामना झिम्बाब्वेसोबत होणार आहे. तसे पाहता भारताचे उपांत्य फेरीतील तिकीट निश्चित झाले आहे. तर सोबतच आज झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स या सामन्यात अजून एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला लिंबू-टिंबू वाटणाऱ्या नेदरलँड्सकडून १३ ध्वनी पराभव पत्करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाने पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील तिकीट निश्चित होण्याकडे मार्ग गेला आहे. पण बांगलादेश देखील या उपांत्य फेरीसाठी मोठी दावेदार आहे.

वाचा: टी-२० वर्ल्डकपमधील मोठी अपेडट; सेमीफायनलचा पहिला संघ ठरला

ॲडलेडमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये लढत सुरु झाली आहे. बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी निश्चित करू शकतो. पण पाकिस्तान गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून उपांत्य फेरीसाठी मुख्य दावेदार आहे. पाकिस्तानसाठी आजचा सामना त्यांचं टी-२ विश्वचषकातील आपले आव्हान ठरवणारा आहे.

वाचा: टी-२० विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर; रोमहर्षक सामन्यात नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव

T20 World Cup points Table

गुणतालिका पाहता आपल्याला समजून घेता येईल कि, भारत ६ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे तर पाकिस्तान ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पण जर पाकिस्तान आजचा सामना जिंकला तर ६ गुणांसह भारताच्याही पुढे जाऊ शकतो. कारण, भारतापेक्षा पाकिस्तानचा नेट रनरेट सर्वात जास्त आहे. पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात पाकिस्तान जिंकला तर पाकिस्तानला २ गुण मिळतील आणि पाकिस्तान अधिक रानरेट असल्याने भारताच्या पुढे प्रथम क्रमांकावर जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारताला आजच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करणं, महत्त्वाचं ठरेल. तर दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवामुळे त्यांचं टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here