मेलबर्न : टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत भारत आज आपला शेवटचा साखळी सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळत आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवल्याने भारताचा सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र तरीही झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारत सन्मानाने सेमीफायनलमध्ये धडक देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याआधी काल सरावादरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने चाहत्यांना आपल्या ‘बर्थ डे’निमित्त एक मोठं गिफ्ट देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

‘एमसीजी’वरील फलंदाजांच्या सरावासाठी असलेला भाग हा चाहत्यांसाठी खुला असतो. नजीकच्या रस्त्यावरून जातानाही हा सराव दिसू शकतो. रविवारी भारतीय फलंदाज सराव करत असताना तिथे गर्दी होणे अपेक्षितच होते. त्यासोबत माध्यमांचीही गर्दी होती. प्रत्येक भारतीय फलंदाजाचा सराव बघण्याचे औत्सुक्य होते. त्यात विराट कोहलीचे सर्वाधिक आकर्षण. शनिवारी त्याचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याचे चाहते जास्तच उत्साही होते. ते तर लंच बॉक्स घेऊन आले होते. विराटला पाहण्यासाठी कितीही वेळ थांबण्याची त्यांची तयारी होती.

कोहली बाद झाला अन् भारतासाठी आली वाईट बातमी, पाहा झिम्बाब्वेच्या सामन्यात काय घडू शकतं

विराटचा ‘बर्थडे’ आणि देशासाठीचं गिफ्ट

विराटने फलंदाजीचा सराव सुरू केल्यावर टाळ्या वाजवून ‘हॅपी बर्थडे डिअर विराट’ असे म्हणण्यास सुरुवात झाली. विराटने हात उंचावून आभार मानले. हे पाहिल्यावर ठिकठिकाणच्या चाहत्यांनी नेटच्या पसिरातील विविध भागातील चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. विराटने सर्वांचे आभार मानण्याऐवजी ‘वुई-वाँट-सिक्सर’ या मागणीची पूर्तता संधी मिळताच करणे जास्त पसंत केले. विराटने सकाळी संघसहकाऱ्यांसह आणि त्यानंतर माध्यम प्रतिनिधींसह केक कापला. याची सर्व चाहत्यांना कल्पना नव्हती. त्यांची अपेक्षा कोहलीने वर्ल्ड कप भारतास जिंकून देणे ही आहे.

एक चूक अन् भारताला डेंजर संघाशी भिडावं लागणार; टीम इंडियासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा

भारतीय संघाचे सराव सत्र संपवून कोहली ‘एमसीजी’वरील गॅलरीत परतत असताना अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. विराट त्यांच्या शुभेच्छांचा हसून स्वीकार करत होता. त्याच वेळी एक प्रश्न आला. ‘विराट सार्वजनिकपणे तू वाढदिवस यापूर्वी कधी साजरा केला आहेस?,’ या वरिष्ठ पत्रकाराच्या प्रश्नाकडे विराट दुर्लक्ष करू शकला नाही. त्याने ‘तुम्ही कधी मला वाढदिवसाच्या दिवशी केक पाठवलाही नाहीत,’ असे चटकन उत्तर दिले.

माध्यमांचे प्रतिनिधी विराटला प्रश्न विचारण्याची संधी सोडणार नव्हते. आज काहीतरी बोल अशी विनंती केल्यावर माजी भारतीय कर्णधाराने ‘मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही’ असे ठामपणे; पण नम्र स्वरात सांगितले. कोणी काहीच बोलत नाही, हे पाहिल्यावर विराटने हळूच टिप्पणी केली. ‘मला एमसीजीवर केक कापायला नक्कीच आवडेल. खर तर तो एक कापण्याची माझी इच्छा आहे,’ असे विराट म्हणाला. पुढील रविवारी (ता. १३) टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत आहे, त्यामुळे विराटला काय सूचवायचे आहे, ते प्रत्येच्याच लक्षात आले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here