T20 WC 2022 Points Table: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेच्या संघाचा मोठ्या फरकानं पराभव केलाय. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतानं 71 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयानंतर सेमीफायनलमध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार हे स्पष्ट झालंय. सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी आणि पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. दरम्यान, सुपर 12 फेरीतील गुणतालिकेत भारताची दहशत पाहायला मिळत आहे. सुपर 12 फेरीत भारत सर्वाधिक गुण मिळवणारा संघ ठरला आहे. भारताचे आठ गुण आहेत. तर, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे प्रत्येकी सात-सात गुण आहेत. परंतु, न्यूझीलंडचा नेट रनरेट इंग्लंडपेक्षा सरस आहे. त्यानंतर या यादीत पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरलेला होता. या स्पर्धेत भारतानं पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला. तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या स्पर्धेत भारताच्या जवळपास सर्वच लढती रोमहर्षक ठरल्या. ज्यामुळं भारताच्या विजयानंतरही त्यांच्या रन रेटमध्ये काही फारसा बदल पाहायला मिळाला नाही. त्यानंतर सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा दारूण पराभव केला. या विजयानंतर भारताचे आठ गुण झाले. दरम्यान, सर्वाधिक 8 गुणांसह सेमीफायनलमध्ये धडक देणारा भारत एकमेव संघ आहे. 

टी-20 विश्वचषकातील गुणतालिका-

भारताचा झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय
टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात झिम्ब्बाब्वेचा संघ 115 धावांवर गारद झाला. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 

सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी
ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं सेमीफायनल गाठली आहे. पाच पैकी चार साखळी सामने जिंकत भारतानं दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. आता भारत हा ग्रुप 2 मधून सर्वाधिक गुणांनी सेमीफायनलमध्ये पोहोचला असून त्यामुळे भारताची लढत ग्रुप 1 मधून दुसऱ्या क्रमांकावर सेमीफायनल गाठलेल्या अर्थात इंग्लंड संघाशी असणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 1.30 सुरू होईल.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here