नवी दिल्ली: क्रिकेटचा इतिहास जितका रंजक आहे तितकाच त्यातील विक्रम देखील. कसोटी हा प्रकार क्रिकेटचा मुळ भाग मानला जातो. अशा कसोटीत एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू झाले आहेत. ज्यांनी विक्रमांचा डोंगर उभा केला. अशाच काही खेळाडूंपैकी काही मोजके खेळाडू आहेत जे सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले तर काही खेळाडू असे आहेत जे कधीच शून्यावर बाद झाले नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये असे मोजके खेळाडू आहेत जे करिअरमध्ये कधीच शून्यावर बाद झाले नाहीत. या मोजक्या खेळाडूंमध्ये भारताच्या एका खेळाडूचा समावेश आहे. भारतीय संघातील माजी फलंदाज आणि सध्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL)चे चेअरमन ब्रजेश पटेल हे आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये कधीच शून्यावर बाद झाले नाहीत.

वाचा-
शून्यावर बाद न होणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहेत ऑस्ट्रेलियाचे जेम्स वॉलेस ब्रूक. त्यांनी १९५१ ते ५९ या काळात २४ कसोटी सामन्यात ४४ डावात ३४.५९च्या सरासरीने १ हजार २८० दावा केल्या. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे रेगी डफ आहेत. त्यंनी १९०२ ते ०५ या कालावधीत २२ कसोटीत ४० डाव खेळले. त्यानंतर क्रमांक येते भारताच्या ब्रजेश पटेल यांचा त्यांनी २१ कसोटीत ३८ डाव खेळले यात २९.४५च्या सरासरीने ९७२ धावा केल्या.

वाचा-
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण २५ क्रिकेटपटू आहेत जे कधीच शून्यावर बाद झाले नाहीत. या यादीत फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. यापैकी सध्या खेळणाऱ्या इंग्लंडच्या ज्यो डेनली याचा समावेश आहे. त्याने २०१९ ते २०२० पर्यंत १५ कसोटीत २८ डाव खेळले आहेत. आतापर्यंत तो कधीच शून्यावर बाद झाला नाही. त्याने २९.५३च्या सरासरीने ८२७ धावा केल्या असून ९४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

वाचा-
तर वनडे क्रिकेटमध्ये असे पाच फलंदाज आहेत जे कधीच शून्यावर बाद झाले नाहीत. यात भारताचा यशपाल शर्मा यांचा समावेश आहे. १९७८ ते १९८५ या काळात टीम इंडियाकडून खेळताना शर्मा यांनी ४२ वनडे खेळले त्यात ८८३ धावा केल्या. या काळात ते एकदाही शून्यावर बाद झाले नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू केप्लर वेसल्स, दक्षिण आफ्रिकेचा जॉक रुडॉल्फ, आफ्रिकेचे पीटर कर्स्टन, स्कॉटलंडचा मॅथ्यू क्रॉस यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स आता टेलिग्रामवरही आहे. लेटेस्ट बातम्या आता मोबाइलवरही मिळवा. फॉलो करण्यासाठी करा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here