T20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात अनोखा सीजन ठरला आहे. या सामन्यात क्रिकेटप्रेमींना अनेक गोष्टी पाहिल्या. पावसामुळे सामन्यात आलेले अडथळे, तसंच टेबल टॉपर असलेला दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीतून बाहेर पडला, यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्याचं पाहिलं. दोन वेळा चॅम्पियन राहिलेला वेस्टइंडिज सुपर-१२ पूर्वीच स्पर्धेतून बाद झाला होता. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचला. आता स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होऊ शकतो अशी शक्यता आहे.

भारताकडून इंग्लंडचा पराभव

भारताने २०२२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारताने यजमान इंग्लंडवर दोन्ही मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर धूळ चारली होती. हेही वाचा – T20 World Cup 2022: पहिली सेमीफायनलिस्ट टीम मिळाली, या दिवशी भारत-पाकिस्तानचा फैसला, जाणून घ्या समीकरणं

टीम इंडिया

भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला असून, भारताला हरवणं इंग्लंडसाठी तितकंस सोपं नसेल. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड अतिशय चांगला आहे. रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीगच्या विजेतेपदाच्या लढतीत कधीही पराभूत झाला नाही. तसंच आशिया चषक किंवा निदाहास करंडक स्पर्धेत त्याला कोणीही पराभूत करू शकलं नाही. त्यामुळेच नॉकआउटमध्ये रोहित शर्माच्या संघाला अधिक पसंती आहे.

ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून न्यूझीलंडचा पराभव

टी-२० वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी पाकिस्तानी संघाने न्यूझीलंडमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडसह तिरंगी मालिका खेळली. टी-२० मालिकेतील विजेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने होते. जेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानने केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाचा ५ विकेट्सने पराभव केला होता. म्हणजेच न्यूझीलंड हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान नाही. आता उपांत्य फेरीतही ते न्यूझीलंडचा पराभूत करू शकतात.

पाकिस्तानचा पराभव करणं किती सोपं?

२०२१ मध्ये पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. यावेळी ते सामना जिंकण्यात कोणतीही कमी बाकी ठेवणार नाहीत. शाहीन अफ्रिदीने बांगलादेशविरोधात ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.

टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनमध्ये पोहोचली आहे. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात ९ नोव्हेंबरला न्यूझीलंडची सामना पाकिस्तानविरुद्ध होईल. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना १० नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचून इतिहास घडवण्याची संधी आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here