क्रिकेटला ‘जेंटलमेन गेम’ असं म्हटलं जातं. असं असलं तरी सगळीकडेच असं चित्र नाही. टी२० वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या श्रीलंकन क्रिकेटर दनुष्का गुनाथिलका याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गंभीर आरोप करत त्याला रेप केसमध्ये अटक करण्यात आली आहे. अनेक क्रिकेटर्स सेक्स स्कॅंडलमध्ये आढळल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. यामुळे मोठा वादंगही झाला आहे. यात नुकतंच श्रीलंकन क्रिकेटर दनुष्का गुनाथिलकाचं नाव समोर आलं आहे. दनुष्का गुनाथिलकाला सिडनीत अटक करण्यात आली. वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेलेल्या गुनाथिलकाला टीमच्या हॉटेलमधून अटक करण्यात आली. २९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. त्याचा जामीन अर्ज सिडनी कोर्टाने फेटाळला असून त्याला श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातूनही निलंबित करण्यात आलं आहे.

एक, दोन नाही…९ सेक्स स्कँडलमध्ये अडकला शेन वॉर्न

दनुष्का गुनाथिलकाआधी सेक्स स्कँडलमध्ये शेन वॉर्नचं नाव सर्वात सर्वाधिक गाजलं होतं. २००० मध्ये वॉर्न एका ब्रिटिश नर्सला अश्लील कॉल आणि मेसेज करताना पकडला गेला होता. त्यावेळी त्याला ऑस्ट्रेलिया संघाचं उप-कर्णधार पद गमवावं लागलं होतं. २००३ मध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये त्याचं नाव आलं होतं. त्यानंतर २००६ मध्ये वॉन दोन ब्रिटिश मॉडेल्ससह एका व्हिडिओमध्येही दिसला होता. कमीत-कमी ९ स्कँडलमध्ये शेन वॉर्नचं नाव आलं आहे. काही गोष्टींचा उल्लेख त्याने त्याच्या आत्मकथेतही केला आहे.

शाहिद अफ्रिदी

सेक्स स्कँडल, MMS कांड, लैंगिक शोषण अशा अनेक गोष्टींमध्ये क्रिकेटर्स नाव आलं आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीही या लिस्टमध्ये आहे. २००० मध्ये अफ्रिदी आणि काही इतर खेळाडूंना हॉटेलच्या एका रुममध्ये काही मुलींसोबत पकडण्यात आलं होतं. त्या मुली ऑटोग्राफ घेण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डला त्यांच्यावर विश्वास नव्हता. या सर्वांना केनियामध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर केलं होतं.

केविन पीटरसन – क्रिस गेल

इंग्लंडचा पॉप्युलर क्रिकेटर केविन पीटरसनही अनेक वादांमध्ये अडकला आहे. बिग ब्रदर फेम प्लेबॉय मॉडेल वेनेसा निम्मोसह त्याच्या अफेयरच्या चर्चा होत्या. पीटरसनने एका SMS द्वारे निम्मोशी ब्रेकअप केलं होतं. त्यानंतर निम्मोने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते.

क्रिस गेल श्रीलंकेतील हॉटेलमध्ये तीन ब्रिटिश महिलांसह पकडला गेला होता. त्यानंतर क्रिस गेलने एका टीव्ही प्रेझेंटरला ड्रिंक्ससाठी विचारला होतं आणि बेबी असंही म्हटलं होतं, त्यानंतर मोठा वाद झाला होता. २०१५ मध्ये वर्ल्ड कपदरम्यान एका महिला स्टाफने क्रिस गेलवर त्याने प्रायव्हेट पार्ट दाखवला असल्याचा आरोप केला होता.

हर्शेल गिब्स – इमाम-उल-हक

हर्शेल गिब्सने आपल्या ऑटोबायोग्राफी To The Point मध्ये काही खळबळजनक खुलासे केले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या १९९९ वर्ल्ड कपदरम्यान गिब्सने हॉटेलच्या एका कर्मचाऱ्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर इमाम-उल-हकचे कथित चॅट्स व्हायरल झाले होते. स्क्रिनशॉट शेअर करत त्याच्यावर ७ ते ८ महिलांना एकाचवेळी डेट करत असल्याचे आरोप लावण्यात आले होते. त्याने अधिकृत माहिती दिली नाही, पण PCB ने दखल घेतल्यानंतर त्याने माफी मागितली होती.

असद रऊफ – डॅरेल टफी

ICC च्या पॅनल ऑफ अंपायर्सच्या लिस्टमध्ये असलेल्या असद रऊफवर २०१२ मध्ये अतिशय गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी २१ वर्षीय तरुणीने असदसोबत अफेयर असल्याचा दावा केला होता. त्याच्यावर लग्नाच्या नावे लैंगिक शोषण करण्याचे आरोपही लावण्यात आले आहेत.

२००५ मध्ये न्यूझीलंडचा बॉलर डॅरेल टफीचा कथित MMS समोर आला होता. दोन ब्रिटिश बॅकपॅकर्सनी मोबाईल फोनवर टफीचा व्हिडिओ चित्रीत केला होता. यात २३ वर्षीय तरुणीसोबत टफी अक्षेपार्ह अवस्थेत दिसत होता. तरुणीसोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचं त्यावेळेस बोललं जात होतं.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here