ॲडलेड: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या उत्कृष्ट यॉर्कर गोलंदाजीची प्रसिद्ध आहे. सध्या तो पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे बुमराहला सध्याच्या टी-२० विश्वचषकातूनही बाहेर व्हावे लागले आहे. तसेच न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याची निवड झालेली नाही. दुखापतीमुळे बुमराह भारतीय संघाचा भाग नसला तरी त्याची पत्नी संजना गणेशन टी-२० विश्वचषक सामना कव्हर करण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे.

संजना टी-२० विश्वचषकातील सामने कव्हर करतानाच आपले सुंदर फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. संजना एक स्पोर्ट्स अँकर असून सोशल मीडियावर तिच्या पोस्ट्सना फार पसंती मिळते. तर असाच एक फोटो संजना गणेशनने इन्स्टाग्रामवर ॲडलेड ग्राउंडवरील शेअर केला आहे. संजनाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सध्या ॲडलेडमधील हवामान सुखद आहे.’ विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना ॲडलेड क्रिकेट मैदानावरच खेळवला जाणार आहे.

वाचा: सिडनीत आज भारत कोणाच्या बाजूने? पाकिस्तान की न्यूझीलंड? भारतीय चाहत्यांची

संजनाची ही पोस्ट एका यूजरला आवडली नाही आणि त्याने बुमराहच्या पत्नीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मॅडम तुम्ही एवढ्या सुंदर नाही आहेत पण तरी बुमराहला कसं काय प्रेमात पाडलं, अशा पद्धतीची कमेंट त्याने केली. ही कमेंट पाहून संजना भडकली आणि उत्तर देताना तिने लिहिले, ‘स्वतः चपलीसारखं तोंड घेऊन फिरतो आहे त्याच काय? संजना गणेशनची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Sanjana Ganeshan Instagram Post

हेही वाचा: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाचा रिलॅक्स डे! टीम इंडियाचा कोचची वेगळीच शक्कल..

संजनाची ही पोस्ट एका यूजरला आवडली नसली तरी त्याने बुमराहच्या पत्नीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या फोटोवर कमेंट करताना युजरने लिहिले की, ‘मॅडम एवढ्या सुंदर नसतील पण बुमराहला कसे घेतले.’ ही कमेंट पाहून संजना भडकली आणि उत्तर देताना तिने लिहिले, ‘आणि तुम्ही स्वतःच्या रूपात फिरत असलेल्या चप्पलचे काय? संजना गणेशनची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

वाचा: रोहित-विराट ‘बडे दिलवाले’, फ्लाईटमध्ये प्रवासादरम्यान आपली बिझनेस क्लास सीट पाहा कोणाला दिली….

पूर्वीदेखील आशिया कपदरम्यान तिच्या आणि बुमराहच्या एका फोटोवर तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण तेव्हाही तिने तोडीस तोड उत्तर देत त्या ट्रोलरची तिने बोलती बंद केली होती. बुमराह मैदानात यॉर्कर टाकत फलंदाजाला गप्प करतो तर इथे संजना ट्रोलर्सला यॉर्कर टाकत क्लीन बोल्ड करताना दिसत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here