नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवा स्टार सूर्यकुमार यादववर पैशांचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सूर्याची बॅट मैदानावर विरोधी संघांविरुद्ध धुमाकूळ घालत असताना जाहिरातींच्या दुनियेतही त्याचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सूर्यकुमार सध्या सुमारे १० ब्रँडशी जोडला गेला आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादवचे मूल्य तिपटीने वाढले आहे.

Suryakumar Yadav: उगाच नाही मिस्टर ३६० डिग्री होत; सूर्याच्या चौकार-षटकारामागे असा आहे डाएट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी तो जाहिरातींसाठी दररोज १५ ते २० लाख रुपये आकारत होता. आणि आता त्याची एका दिवसाची फी सुमारे ६५ लाख रुपये झाली आहे. अशाप्रकारे त्याचे मूल्य तीन पटीने वाढले आहे. मिंटमधील वृत्तानुसार सूर्यकुमार येत्या काही दिवसांत आणखी दहा ब्रँड्सशी व्यवहार करणार असून यामध्ये तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादवला ३६० डिग्री प्लेअर बनवण्यात ‘या’ डाएट प्लॅनचं योगदान, पाहा SKY ची डायटिशियन काय सांगतेय

३२ वर्षीय सूर्यकुमार सध्या रॉयल स्टॅग, फॉर्मा हेल्मेट्स, फॅनक्रेझचे फेज एनएफटी, मॅक्सिमा स्मार्टवॉचेस, ड्रीम११, पिंटोला पीनट बटर आणि बोल्ट ऑडिओशी संबंधित आहेत. लक्षात घ्या की सूर्याची मागणी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यापेक्षा जास्त आहे. गेल्या एका महिन्यात अनेक ब्रँड्सनी सूर्यकुमार यादवला करारबद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारची बॅट धावांचा पाऊस पाडत आहे. दुसरीकडे, राहुलची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर पंतला फारशी संधी मिळाली नाही.

Suryakumar Yadav: धावांच्या संख्येसह वाढला सूर्यकुमारच्या उत्पन्नाचाही आकडा, सूर्या महिन्याला करतो इतकी कमाई

तज्ञ काय म्हणतात
नवीन क्रिकेटपटू जाहिरातींसाठी दररोज २५ ते ५० लाख रुपये घेतात तर यशस्वी खेळाडूंना दररोज ५० लाख ते १ कोटी रुपये मिळतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. सूर्यकुमार यादव मॅच विनर म्हणून उदयास आल्याचे त्यांचे मत आहे. त्याच्याकडे अप्रतिम प्रतिभा आहे. यामुळेच तो ब्रँड्सची पहिली पसंती ठरत आहे. दरम्यान, सूर्यकुमार येत्या काळात आणखी १५ हून अधिक ब्रँडशी जोडला जाऊ शकतो. सध्या या लीगमध्ये पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारने आत्तापर्यंत पाच सामन्यात ७५ च्या सरासरीने २२५ धावा केल्या आहेत. यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here