PAK vs NZ T20 World Cup: न्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानच्या बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी शतकी सलामी दिली. त्यामुळेच त्यांना या सामन्यात विजय साकारता आला आणि आता त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बाबर आझमने यावेळी ४२ चेंडूंत ५३ धावांची खेळी साकारली व ही खेळी मोलाची ठरली.

पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानकडून पहिले षटक शाहीन शाह आफ्रिदी टाकायला आला. तर किवी संघाकडून फिन अॅलेन आणि डेवॉन कॉनवे ही सलामीची जोडी मैदानात अली. आफ्रिदीने पहिला चेंडू अॅलेनला टाकला आणि पहिल्याच चेंडूवर अॅलेनने शानदार चौकार मारला. यानंतर एक वेगळाच ड्रामा झाला. आफ्रिदीने दुसरा चेंडू टाकला आणि दुसऱ्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीने LBW आऊट झाल्याचा अपील केला, पण न्यूझीलंडने लगेच रिव्यू घेतला आणि हा रिव्यू न्यूझीलंडच्या बाजूने गेला आणि अॅलेनला नाबाद दिले. शाहीन डगमगला नाही त्याने अॅलेनला आऊट करायचे मनात ठाम केले होते आणि तिसरा चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूवर अॅलेन वाचला पण तिसऱ्या चेंडूवर अखेरीस आफ्रिदीने अॅलेनला LBW आऊट केले. तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १ बाद ४ धावा अशी होती. त्यानंतर पाकिस्तानने सामन्यावर नियंत्रण ठेवलं आणि या गोष्टीचाच फायदा त्यांना यावेळी झाला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times