बीसीसीआयसाठी एक धक्कादायक गोष्ट आज पाहायला मिळाली. बीसीसीआयला तब्बल ४८०० कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचे आता पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलमधील एक चूक त्यांना आता चांगलीच महागात पडू शकते, असे म्हटले जात आहे.

यंदा आयपीएल झाली नाही तर बीसीसीआयला चार हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असे म्हटले जात होते. पण आयपीएलमधील एक जुने प्रकरण आता निकाली निघाले आहे. त्यानुसार बीसीसीआयला आता ४८०० कोटी रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे.

नेमके प्रकरण आहे तरी काय…आयपीएलमध्ये सुरुवातीला आठ संघ होते. त्यामधील एक संघ होता तो डेक्कन चार्जर्स. तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी आयपीएलही जिंकली होती. पण त्यानंतर २०१२ साली बीसीसीआयने डेक्कन चार्जर्स संघाला आयपीएलमधून बाद केले होते. आर्थिक गोष्टी योग्यपणे हाताळल्या नाहीत, असे त्यावेळी बीसीसीआयचे म्हणणे होते. त्यामुळे बीसीसीआयने डेक्कन चार्जर्सच्या संघाला आयपीएलमधून बाहेर केले होते.

आयपीएलमधून आपली गच्छंती केल्यानंतर डेक्कन चार्जर्स संघाची मालकी असलेल्या डेक्कन क्रोनिकल या कंपनीने बीसीसीआयविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आपल्या आयपीएलमधून बेकायदेशीरपणे बाहेर काढण्यात आले आहे, असा आरोप डेक्कन क्रोनिकल या कंपनीने बीसीसीआयवर केला होता. हे प्रकरण थोडे लांबत असल्याचे पाहिल्यावर उच्च न्यायालयाने एका लवादाची स्थापना २०१२ साली केली होती. यावेळी बीसीसीआय आणि डेक्कन चार्जर्स यांच्यापैकी कोणाची बाजू योग्य आहे, ही जबाबदारी या लवादाकडे होती. आज या लवादाने आपला निर्णय दिला आहे. त्यानुसार याप्रकरणी बीसीसीआयची चुकी असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून बीसीसीआयला ४८०० कोटी रुपये द्यावेत, असे या लवादाने स्पष्ट केले आहे. त्यामुळए बीसीसीआयला या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे आता नेमके काय करायचे, याचा विचार बीसीसीआय करत आहे. कारण सध्याच्या घडीला क्रिकेट ठप्प असल्यामुळे क्रिकेटचे सामने ठप्प आहेत, त्यामुळे बीसीसीआयचे उत्पन्नही थांबलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here