करोना व्हायरसमुळे चार महिने क्रिकेट ठप्प झालेले होते. पण त्यानंतर आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु झालेली आहे. करोनानंतर सुरु झालेली ही पहिली क्रिकेटची मालिका आहे. पण या मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. पण आता काही दिवसांनी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहता येणार आहे.
इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला प्रेक्षकांना मैदाात परवानगी देण्यात आलेली नाही. पण ऑक्टोबर महिन्यापासून इंग्लंडमध्ये चाहत्यांनाही मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आज सांगितले की, ” ऑक्टोबर महिन्यापासून मैदानात प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा आमचा विचार आहे. करोना व्हायरसमुळे या परिस्थितीत जेवढी सुरक्षितता आम्हाला ठेवता येईल, तेवढा प्रयत्न आम्ही नक्कीच करू.”
चार महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये क्रिकेटला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने काही गोष्टी केल्या आहेत. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने जैव सुरक्षित वातावरण बनवले आहे. जैव सुरक्षित वातावरणासाठी इंग्लंडने एक मशिन क्रिकेट मैदानात लावली आहे. त्यामुळे व्हायरसचे संक्रमण होत नाही. पण या वातावरणासाठी काही नियमही बनवण्यात आले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा संघाबरोबर होता. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. पण दुसऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर काढण्यात आले. कारण आर्चर हा गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मँचेस्टर येथून दोन तासावर असलेल्या ब्रिगटेन येथे तिच्या घरी गेला होता. ही गोष्ट इंग्लंडच्या संघाला समजली. इंग्लंडच्या खेळाडूंसाठी हॉटेलचा रुम ते मैदानातील प्रवास हा सर्व सॅनिटराईज केला आहे. त्यामुळे काही गोष्टींची काळजी खेळाडूंनीही घ्यायची आहे.
आर्चरने हे नियम मोडले आणि तो गर्लफ्रेंला तिच्या घरी जाऊन भेटून आला. त्यामुळेच आता त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे. आर्चरला आता आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्या आता दोन करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्यांमध्ये जर आर्चर निगेटीव्ह सापडला तरच त्याला इंग्लंडच्या संघाकडून खेळता येणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times