जेव्हा संघ हॉटेलमधून स्टेडियमला जायचा तेव्हा बसमध्ये बसण्याची या खेळाडूला परवानगी नव्हती. त्यामुळे हा खेळाडू बसच्या ड्रायव्हरकडे आपली बॅग द्यायचा आणि त्याला बसच्या मागे धावत स्टेडियमला पोहोचावे लागायचे. याबाबत हा खेळाडू म्हणाला की, ” मी देशासाठी क्रिकेट संघातून खेळत होतो. आमचे राष्ट्रगीत एक होते. पण संघातील खेळाडूंनी नेहमीच मला सापत्न वागणूक दिली. संघ जेव्हा स्टेडियममध्ये जाण्यासाठी बसमध्ये बसायचा तेव्हा मला तसे करता येत नव्हते. कारण मला ड्रायव्हरला बॅग देऊन बसच्या मागे धावत स्टेडियमपर्यंत पोहोचावे लागायचे. बरीच लोकं पाहायची, पण मला असं का करावं लागतं, याबाबत त्यांनी मला कधीच विचारले नाही.”
वाचा-
या खेळाडूने आपली व्यथा सांगितली की, ” मी जिथे बसायचो तिथे बाकीचे खेळाडू बसायचे नाहीत. त्याचबरोबर सामना जिंकला की, सर्वच जणं सेलिब्रेशन करायचे, पण सामन्यात पराभव स्वीकारावा लागला की तो माझ्या माथी मारायचे. माझ्याबरोबर संघातील कोणताही खेळाडू जेवायला यायचा नाही. त्याचबरोबर कुठेही बाहेर जाताना संघातील खेळाडू मला त्यांच्याबरोबर न्यायचे नाहीत. माझ्यासमोर संघाची रणनीती ठरवली जायची. पण त्यामध्ये भाग घेण्याची संधी मला नसायची. या सर्व गोष्टी मी संघात राहून सहन केल्या आहेत.”
वाचा-
हा खेळाडू आहे तरी कोण…वर्णद्वेषाचा आरोप करणारा हा खेळाडू आहे तरी कोण, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर हा खेळाडू आहे दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एंटिनी. आपल्याबरोबर संघात असताना वर्णद्वेषामुळेच योग्य वागणूक मिळायची नाही, असा आरोप आज एंटिनीने केला आहे. एंटिनीच्या नावावर ६६२ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत, त्यामुळे तो कसा गोलंदाज होता याचा अंदाज तुम्हालाही येऊ शकतो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times