मुंबई: भारतीय संघासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला. आज भारताला इंग्लंडविरोधातील टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये मोठा पराभव स्विकारावा लागला. इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अपुरं राहिलं आहे. सामना हरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू साठून आले, तो रडताना दिसला. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत भावूक होता.

डगआऊटमध्ये बसलेला रोहित शर्माचे डोळे पाणावले

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा हा खाली मान घालूनच मैदानातून बाहेर पडला. त्यानंतर डगआऊटमध्ये बसल्यावर त्याला रडू कोसळलं. भारताचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न हातातून निसटल्याने रोहित शर्मा भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो डोळे पुसताना दिसला. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी रोहित शर्मा एकटा बसला होता आणि आपल्या भावनांना अश्रूंद्वारे वाट मोकळी करुन देताना दिसला.

पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नशिबी निराशाच आली. २०१९ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागता होता. तेव्हाही रोहित शर्माला अश्रू अनावर झाले होते.

Rohit Sharma 2019 WC

डगआऊटमध्ये बसलेला रोहित शर्माचे डोळे पाणावले

या विश्वचषकात रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब होती आणि त्याने ६ सामन्यात १९.३३ च्या सरासरीने एकूण ११६ धावा केल्या. याशिवाय, आता त्याच्या टी-२० कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

इंग्लंडचा भारतावर विजय

स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अर्धशतके झळकावली. तेव्हा असं वाटलं होतं की भारत सेमी फायनल जिंकेल. पण तरीही संघाला विजयाला गवसणी घालता आली नाही. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ६ बाद १६८ धावा केल्या. कोहलीने ४० चेंडूत ५० धावा केल्या तर पांड्याने ३३ चेंडूत ६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १६ षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद १७० धावांची भागीदारी केली.

सेमी फायनल

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here