भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्जा आणि पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिकचा घटस्फोट होत आहे. रिपोर्ट्सनुसार, या सेलिब्रिटी कपलच्या एका जवळच्या व्यक्तीने सानिया शोएबपासून दूर दुबईत राहत असल्याचं सांगितलं. त्याशिवाय शोएबच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या एका सदस्याने या दोघांचा अधिकृत घटस्फोट झाल्याचं सांगितलं. सध्या दोघंही वेगवेगळे राहत असल्याची माहिती आहे. कमाईच्या बाबतीत सानिया शोएब मलिकपेक्षा मागे नाही. किती आहे या दोघांचं नेटवर्थ? किती आहे संपत्ती? भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्जा भारतातील सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. शोएबसोबतच्या तिच्या घटस्फोटाची चर्चा असताना, सानियाच्या लक्झरी लाइफचीही चर्चा होते आहे. सानियाचं एकूण नेटवर्थ २५ मिलियन डॉलर जवळपास २०० कोटी रुपये आहे. केवळ खेळच नाही, तर सानिया एंडोर्समेंटद्वारेही मोठी कमाई करते.

टेनिसमधून होते इतकी कमाई

कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण असलेली सानिया केवळ टेनिस खेळून वर्षाला करोडो रुपये कमावते. या खेळातून सानियाचं अंदाजे वार्षिक उत्पन्न ३ कोटी रुपये आहे. त्याशिवाय पॉप्युलर ब्रँड्सच्या एंडोर्समेंटद्वारे वर्षाला जवळपास २५ कोटी रुपये कमाई होते. सानिया स्प्राइट, आदिदाससारख्या चॉप ब्रँड्सशी जोडलेली आहे. यातून तिची मोठी कमाई होते. तसंच सानिया स्वत:ची एक टेनिस अॅकॅडमीही चालवते.

तेलंगणा राज्याची ब्रँड अॅम्बेसेडर

सानिया मिर्झाची इतर काही स्त्रोतांमधूनही कमाई होते. तेलंगणा राज्याची ब्रँड अॅम्बेसेडर असण्याशिवाय, ती संयुक्त राष्ट्रांची सदिच्छा दूत देखील आहे. सानियाचं हैदराबादमध्ये घर आहे. त्याशिवाय तिचं दुबईतही अलिशान घर आहे. हैदराबादच्या तिच्या घराची किंमत जवळपास १३ कोटी रुपये आहे. त्याशिवाय सानियाला लग्झरी कार्सचीही आवड आहे. तिच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. रेंज रोवर, मर्सिडिज बेंज, ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या तिच्याकडे आहेत.

शोएबची कमाई

सानियासह शोएबची एकट्याचीही जवळपास इतकीच संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, शोएबचं नेटवर्थ २८ मिलियन डॉलर जवळपास २२८ कोटी रुपये आहे. याच्या कमाईचा एक मोठा भाग स्पोर्ट्समधून येतो. त्याशिवाय शोएब अनेक ब्रँड्सच्या एंडोर्समेंटद्वारेही कमाई करतो. तसंच शोएबकडे अनेक लक्झरी कार्सचं कलेक्शन आहे. हेही वाचा – Sania Mirza and Shoaib Malik : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा सुखी संसार मोडला, कारण आलं समोर

पाकिस्तानी अभिनेत्री घटस्फोटाचं कारण?

शोएब – सानियाच्या घटस्फोटामागे पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसह असल्याचं बोललं जातं. याआधी नोव्हेंबर २०१० मध्ये शोएब आणि आयशा यांनी बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यावेळीही ते दोघं चर्चेत आले होते. आयशा उमर एक वर्षाची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर तिला आणि तिच्या भावाला आईने एकटीनेच वाढवलं. ‘जिंदगी गुलजार है’ मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली होती. तिने नॅशनल स्कूल ऑफ आर्ट्समधून बॅचलर आणि मास्टर्स डिग्री घेतली आहे.

२०१० मध्ये लग्न, १२ वर्षांनी नात्यात दुरावा

हैदराबादमध्ये २०१० रोजी १२ एप्रिलला शोएब आणि सानिया यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर लग्नाच्या दहा वर्षांनी सानियाने इजहानला जन्म दिला. आता या दोघांचा मुलगा आठ वर्षांचा आहे. सानिया आणि शोएबने नुकताच मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. शोएबने मुलाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले होते, पण सानियाने हे फोटो शेअर केले नव्हते. तसंच सानियाने मागील जवळपास एक वर्षापासून शोएब सोबतचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. त्यावरुनही दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here