दक्षिण आफ्रिकेमध्य आज दुपारी दोन वाजता एक क्रिकेटचा अनोखा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना ३६ षटकांचा असेल, त्याचबरोबर या सामन्याचे नियमच वेगळे आहेत. त्यामुळे हा सामना कसा होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या स्पर्धेत आजी-माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ए बी डिव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड मिलरसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
काय असतील सामन्याचे नियम…या सामन्यात तीन संघ खेळवले जातील, एकूण ३६ षटकांचा सामना होईल आणि प्रत्येक संघाला १२ षटके फलंदाजी करायला मिळेल. एक संघ अन्य दोन संघांबरोबर सहा-सहा षटकांचे दोन डाव खेळणार आहे. या १२ षटकांमध्ये ज्या संघाच्या सर्वाधिक धावा होतील, तो संघ विजयी ठरणार आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील संघात आठ खेळाडू असतील, त्यामुळे जर सातवा फलंदाज बाद झाला तर आठवा फलंदाज एकटा मैदानात असेल. पण या आठव्या फलंदाजाला एकेरी धाव घेता येणार नाही. या सामन्यातील विजेत्या संघाला सुवर्णपदक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघाला अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळणार आहे. या सामन्यात किंगफिशर, काईट्स आणि इगल्स हे तीन संघ असतील. यावेळी रडाबा किंगफिशर संघाचे नेतृत्व करणार आहे. डी कॉककडे काईट्स संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर डिव्हिलियर्स हा इगल्स या संघाची कमान सांभाळणार आहे. या अनोख्या नियमांमुळे हा सामना कसा रंगेल, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
या सामन्यात सहभागी होणारे संघ पुढील प्रमाणे…ईगल्स – एबी डिव्हिलियर्स ( कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले व्हेरेयन्ने, अँडील फेहलुकवायो, बीजोर्न फॉर्टून, ज्युनियर डाला, लुंगी एनगिडी
काईट्स – क्विंटन डी’कॉक ( कर्णधार), टेंम्बा बवूमा, जॉन-जॉन स्मट्स, डेव्हीड मिलर, ड्वेन प्रेटोरीअस, लुथो सिपाम्ला, बेऊरन हेनड्रीक्स, अॅनरिच नॉर्ट्जे
किंगफिशर – रिझा हेनड्रीक्स ( कर्णधार), हेनरिच क्लासेन, जॅनेमन मलान, फॅफ ड्यू प्लेसिस, थंडो एनटिनी, गेराल्ड कोएत्झी, ग्लेंटोन स्टूर्मन, तरबेझ शॅम्सी.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times