अझर आपली दुसरी पत्नी आणि बॉलिवूडची नायिका संगिता बिझलानीबरोबर एकत्रपणे राहत होता. अझर आणि संगिता यांची जोरदार चर्चा त्यावेळी व्हायची. कारण चाहत्यांसाठी ही नवीन गोष्ट होती. काही जणांनी त्यावेळी अझरवर टीकही केली होती. पण त्यानंतरही अझर संगिताबरोबरच राहायचा. पण एकदा संगितासाठी पाकिस्तानच्या एका कर्णधाराने राडा केल्याचे आता म्हटले जात आहे.
हा क्रिकेटपटू आहे तरी कोण…अझरने भारताचे नेतृत्व केले होते. भारताचे कर्णधारपद भूषवत असताना पाकिस्तानच्या संघात इंझमाम उल हक होता आणि त्यानेच संगिता बिझलानीसाठी राडा केल्याचे आता पाहायला मिळत आहे. इंझमाम हा मैदानात शांतपणे वागणारा खेळाडू होता. पण संगिता बिझलानीवरून त्याने राडा केल्याचे म्हटले जात आहे.
नेमके घडले तरी काय…
अझरच्या पत्नीसाठी इंझमामने कधी राडा केला होता, याचे उत्तर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिसने एका मुलाखतीमध्ये दिला होता. याबाबत वकार म्हणाला की, ” इंझमाम हा शांत खेळाडू होता. त्याने कधी कोणाशी वाद-विवाद किंवा भांडण केले नव्हते. पण काही गोष्टींसाठी इंझमाम कोणाचेच ऐकायचा नाही, अशीच एक गोष्ट घडली आणि त्यानंतर इंझमामने चांगलाच राडा केल्याचे पाहायला मिळाले.”
वकार पुढे म्हणाला की, ” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एका सामन्यातील ही गोष्ट आहे. पाकिस्तानचा संघ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी इंझमाम हा सीमारेषेजवळ उभा होता. त्यावेळी एक चाहता अझरची बायको संगिता बिझलानीबद्दल वाईट बोलत होता. खालच्या दर्जाची टीका त्याच्याकडून संगितावर सुरु होती. हे इंझमामला सहन झाले नाही. त्याने बाराव्या खेळाडूला बॅट आणायला सांगितली आणि त्यानंतर बॅट घेऊन इंझमाम हा थेट प्रेक्षकांमध्ये घुसला होता. या सर्व प्रकारानंतर इंझमामवर आयसीसीने कारवाईही केली होती. पण अझरने या चाहत्याबरोबर बातचीत करून हे प्रकरण कोर्टात जाण्यापासून वाचवले होते. काही जणांना वाटत होते की, चाहता इंझमामला आलू, आलू… म्हणून बोलत असल्यामुळे तो भडकला होता. पण हे प्रकरण वेगळेच होते. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाडूंचे संबंध मैत्रीपूर्ण असायचे आणि ते एकमेकांचा आदर करायचे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times