दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए बी डिव्हिलियर्सने तुफानी फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. डिव्हिलियर्सच्या या दमदार खेळीमुळे त्यांच्या संघाला सुवर्णपदकाची कमाई करता आली.

आज दक्षिण आफ्रिकेत एक अनोखा सामना खेळला गेला. या एकाच सामन्यात तीन संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघाला १२ षटके फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती. ही १२ षटके दोन डावांमध्ये खेळवली गेली. या सामन्यात डिव्हिलियर्सने फटक्यांचा धडाकाच लावत आपण आपण अजूनही फिट आहोत हे त्याने दाखवून दिले. त्याचबरोबर त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देणारी ठरली.

डिव्हिलियर्सने एका डावातील २४ चेंडूमध्ये ६१ धावांची दमदार खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. डिव्हिलियर्सने यावेळी सुरुवातीपासूनच गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली आणि आपले अर्धशतकी झळकावले.

या सामन्यात डिव्हिलियर्स हा ईगल्स संघाचा कर्णधार होता. फलंदाजीबरोबरच डिव्हिलियर्सने चांगले नेतृत्व केले आणि त्यामुळे त्यांच्या संघाला विजय मिळवता आला. या सामन्यात ईगल्स संघाने सर्वाधिक धावा केल्यामुळे त्यांनाच विजयी घोषित करण्यात आले.

या १२ षटकांच्या सामन्यात ईगल्स या संघाने ४ विकेट्सच्या मोबदलत्यात सर्वाधिक १६० धावा केल्या आणि सुवर्णपदक पटकावले. टेंम्बा बवूमाच्या काईट्स या संघाने १२ षटकांमध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात १३८ धावा करत त्यांनी रौप्यपदक पटकावले, तर रिझा हेनड्रीक्सच्या नेतृत्वाखालील किंगफिशर या संघाने १२ षटकांत ५ विकेट्स गमावत ११३ धावा केल्या आणि त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here